मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२७ सप्टेंबर २०२४
मुंबई, – दोन अल्पवयीन मुलीसह एका मुलाशी अश्लील वर्तन करुन विनयभंग झाल्याच्या घटना जोगेश्वरी, मालाड आणि अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी ओशिवरा, कुरार आणि वर्सोवा पोलिसांनी तीन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करुन दोन आरोपींंना अटक केली तर दोन तरुणांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले.
पंधरा वर्षांची अल्पवयीन मुलगी ही जोगेश्वरीतील बेहरामपाड्यात राहत असून ती सध्या शिक्षण घेत आहे. बुधवारी दुपारी तीन वाजता ती तिच्या बहिणीच्या पाच वर्षांच्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी जात होती. यावेळी तिथे आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने तिच्याशी अश्लील संभाषण करुन जवळीक निर्माण करुन तिच्याशी शारीरीक लगट करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर तिने ओशिवरा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच मिथलेश चौधरी कामत या ३३ वर्षांच्या आरोपीस काही तासांत पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने या मुलीचा विनयभंग केल्याचे उघडकीस आले. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. दुसर्या गुन्ह्यांत एका चौदा वर्षांच्या मुलीशी अश्लील संभाषण करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एका ४३ वर्षांच्या आरोपीस कुरार पोलिसांनी अटक केली. बळीत आणि आरोपी मालाड परिसरात शेजारी राहत असून एकमेकांच्या परिचित आहे. गुरुवारी या मुलीशी अश्लील संभाषण करुन आरोपीने तिच्याशी जवळीक निर्माण करुन तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार तिने तिच्या नातेवाईक महिलेस सांगितला. त्यानंतर तिने आरोपीविरुद्ध कुरार पोलिसांत तक्रार केलीद होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होातच काही तासांत मनोजकुमार नावाच्या आरोपीस पोलिसांनी अटक केली.
अकरा वर्षांच्या मुलाशी अश्लील वर्तन
अन्य एका घटनेत एका अकरा वर्षांच्या मुलासोबत त्याच्याच परिचित दोन तरुणांनी अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आले आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींना वर्सोवा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांना ३५ (३) कलमांतर्गत नोटीस देऊन सोडून देण्यात आले होते. ३४ वर्षांची तक्रारदार महिला ही अंधेरीतील वर्सोवा गावात राहते. तिला अकरा वर्षांचा मुलगा आहे. गुरुवारी सकाळी सव्वासात वाजता या मुलाशी या आरोपींनी अश्लील संभाषण करुन त्याच्याशी लैगिंक चाळे करण्याचा प्रयत्न केला होता. मुलाकडून हा प्रकार तिच्या आईला समजताच तिने या दोन्ही मुलांविरुद्ध वर्सोवा पोलिसात तक्रार केली होती. बळीत आणि दोन्ही आरोपी एकाच परिसरातील रहिवाशी असून एकमेकांच्या परिचित असल्याचे पोलिसांनी सांगितले.