मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – शहरात तीन विविध घटनेत सात, नऊ आणि बारा वर्षांच्या तीन अल्पयीन मुलीशी अश्लील चाळे करुन विनयभंग झाल्याचा प्रकार मुलुंड, बोरिवली आणि पवई परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी तीन स्वतंत्र विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवून दोन आरोपींना अटक केली आहे. त्यात एका ७८ वर्षांच्या वयोवृद्धाचा समावेश आहे तर तिसर्या नातेवाईकाचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
४१ वर्षांची तक्रारदार महिला ही मुलुंड परिसरात राहत असून नऊ वर्षांची बळीत तिची मुलगी आहे. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता तिची मुलगी स्विमिंग झाल्यानंतर घरी लिफ्टमधून जात होती. यावेळी लिफ्टमध्ये सुमीत नावाच्या एका ३८ वर्षांच्या व्यक्तीने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार तिने घरी आल्यानंतर तिच्या आईला सांगितला. त्यानंतर तिने मुलुंड पोलिसांना हा प्रकार सांगून सुमीतविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या सुमीतला पोलिसांनी रविवारी सायंकाळी मुलुंड येथून अटक केली. सुमीत हा ठाणे रेल्वे स्थानकातील वेटींग रुम परिसरात राहतो. अटकेनंतर त्याला पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
दुसरी घटना बोरिवली परिसरात घडली. बळीत मुलगी ही दहा वर्षांची असून ती बोरिवलीतील एका अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावर तिच्या पालकांसोबत राहतो. याच अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावर आरोपी वयोवृद्ध राहतो. एकाच अपार्टमेंटमध्ये राहत असल्याने ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता ती कंपाऊंडमध्ये खेळत होती. यावेळी तिथे आलेल्या आरोपीने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला. तिच्या छातीसह इतर ठिकाणी नकोसा स्पर्श करुन लगट करण्याचा प्रयत्न केला. मुलीकडून हा प्रकार तिच्या आईला समजताच तिने एमएचबी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी वयोवृद्धाविरुद्ध तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्घ विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच शनिवारी रात्री उशिरा आरोपीला त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली.
तिसर्या घटनेत पवई येथे एका बारा वर्षांच्या मुलीवर तिच्याच नातेवाईकाने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तक्रारदार महिला ही ऍण्टॉप हिल येथे राहत असून तिला बारा वर्षांची मुलगी आहे. दिवाळीची सुट्टी असल्याने १ नोव्हेंबरला तिची मुलगी तिच्या पवई येथे राहणार्या आईकडे गेली होती. यावेळी मावशीच्या पतीने तिच्याशी झोपेत अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. तिचे कपडे काढून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार घरी आल्यानंतर तिने तिच्या आईला सांगितला. त्यानंतर तिने पवई पोलिसांत बहिणीच्या पतीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी पळून गेला. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.