मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ जानेवारी २०२४
मुंबई, – शहरात तीन विविध घटनेत सहा व नऊ वर्षांच्या तीन अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खार, शिवडी आणि मालाड परिसरात या तिन्ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी निर्मलनगर, शिवडी आणि मालवणी पोलिसांनी तीन स्वतंत्र विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत एका आरोपीला अटक करण्यात आली तर दुसर्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले. तिसरा आरोपी पळून गेला असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
२९ वर्षाची तक्रारदार महिला ही खार परिसरात राहते. सहा वर्षांची पिडीत तिची मुलगी आहे. सोमवारी साडेचार वाजता ती कुराण शिकवणीसाठी जात होती. लिफ्टमधून जाताना आरोपीने तिला बोलावून तिला कुठल्या मजल्यावर जायचे आहे अशी विचारणा केली. तिने पंधराव्या मजल्यावर जायचे असल्याचे सांगितल्यानंतर त्याने तिला आठव्या मजल्यावर आणले. त्यानंतर त्याने तिच्यावर लिफ्टमध्ये अश्लील चाळे करुन जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. तिचा विनयभंग केला. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर तिने निर्मलनगर पोलिसांत आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच ३१ वर्षांच्या आरोपीस पोलिसांनी अटक केली. तक्रारदार महिला आणि आरोपी एकाच परिसरात राहत असून एकमेकांच्या परिचित असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मालवणीतील अन्य एका घटनेत एका सहा वर्षांच्या मुलीचा ५६ वर्षांच्या व्यक्तीने विनयभंग केला. ही मुलगी मालाडच्या मढ-मार्वे रोडवर राहते. तिच्याच शेजारी आरोपी राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. सोमवारी दुपारी दोन वाजता तिची आई घरात इमिटेशन ज्वेलरीचे काम करत होती तर ती घराबाहेर खेळत होती. काही वेळानंतर मुलांचा खेळण्याचा आवाज बंद झाला. त्यामुळे ती बाहेर आली होती. तिने तिच्या मुलीचा शोध घेतला असता ती शेजारीच राहणार्या आरोपीच्या घरात होती. यावेळी तिने आरोपी हा तिच्या मुलीसोबत अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग करताना दिसून आला. तिला बाजूला बसवून तो मोबाईलवर व्हिडीओ दाखवत होता. त्यामुळे तिने मुलीला घरी आणून तिची चौकशी केली असता तिने दादाजीने तिच्या शरीरासह गुप्त भागांवर नकोसा स्पर्श केला होता. त्यानंतर तिने मालवणी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आरोपी वयोवृद्ध तसेच त्याला पॅरालिसीस असल्याने नोटीस देऊन सोडून देण्यात आले. सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
शिवडी येथे एका नऊ वर्षांच्या मुलीचा विनयभंग झाला.याप्रकरणी बळीत मुलीच्या शेजारी राहणार्या ३५ वर्षांच्या भंगार विक्रेत्याविरुद्ध शिवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बळीत मुलगी ही तिच्या पालकांसोबत शिवडी परिसरात राहते. २५ डिसेंबरला सकाळी नऊ वाजता तिच्या घरातील भंगार विकण्यासाठी आरोपीच्या दुकानात गेली होती. यावेळी दुकानात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन त्याने तिला दुकानाच्या पोटमाळ्यावर नेले आणि तिचयाशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. दोन दिवसांपूर्वी या मुलीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला होता. सोमवारी तिच्या आईने शिवडी पोलिसांना हा प्रकार सांगून आरोपी भंगार विक्रेत्याविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपी घटनास्थळाहून पळून गेला आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.