मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ जानेवारी २०२५
मुंबई, – दारु पाजून एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैगिंक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार चेंबूर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सामूहिक लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या तिन्ही आरोपींना चेंबूर पोलिसांनी अटक केली. तिन्ही आरोपी २० ते ३७ वयोगटातील असून अटकेनंतर या तिघांनाही विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
१७ वर्षांची अल्पवयीन मुलगी चेंबूर येथे राहते. तिचा विशाल हा मित्र असून त्याने तिला गुरुवारी रात्री साडेदहा वाजता कामानिमित्त बोलाविले होते. त्यामुळे ती विशालला भेटण्यासाठी गेली होती. तिथे गेल्यानंतर त्याने तिला जबदस्तीने मद्यप्राशन करण्यास प्रवृत्त केले होते. तिथेच त्याचे इतर दोन मित्र उपस्थित होते. काही वेळानंतर त्याच्या मित्राने तिला एका मोकळ्या मैदानात घेऊन गेला. तिथेच त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत विचारणा केली होती. तिने नकार दिल्यानंतर त्याने तिच्याशी जबदस्तीने लैगिंक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तिला उलट्या होऊ लागल्या. तरीही तो तिच्याशी लैगिंक अत्याचाराचा प्रयत्न करत होता. घरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या पालकांना सांगितला. त्यानंतर त्यांनी तिला चेंबूर पोलीस ठाण्यात आणले. घडलेला प्रकार पोलिसांना सांगून तिने तिन्ही आरोपीविरुद्ध तक्रंार केली होती. या तक्रारीनंतर या तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या तिन्ही आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते तिघेही पोलीस कोठडीत आहेत. पिडीत मुलीसह तिन्ही आरोपींची लवकरच मेडीकल होणार आहे.
वडाळ्यात पित्याकडून अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार
वडाळा येथे राहणार्या एका पंधरा वर्षांच्या मुलीला चाकूचा धाक दाखवून तिच्याच पित्याने लैगिंक अत्याचार केल्याची बापलेकीच्या काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन आरोपी पित्याला वडाळा टी टी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. ४० वर्षांची तक्रारदार महिला ही वडाळा येथे राहते. पिडीत पंधरा वर्षांची पिडीत तिची मुलगी तर आरोपी तिचा पती आहे. डिसेंबर २०२४ ते जानेवारी २०१५ या कालावधीत आरोपीने त्याच्याच मुलीला चाकूचा लैगिंक अत्याचार करत केला होता. हा प्रकार कोणालाही सांगितला तर तिला तो जिवे मारण्याची धमकी देत होता. शुक्रवारी हा प्रकार मुलीकडून तिच्या तक्रारदार आईला समजताच तिने आरोपी पतीविरुद्ध वडाळा टी टी पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपीस पोलिसांनी अटक केली. बापलेकीच्या काळीमा फासणार्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
मालाड येथे पााच वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार
तिसर्या घटनेत एका पाच वर्षांच्या मुलीवर तिच्याच शेजारी राहणार्या ३८ वर्षांच्या कारपेंटर आरोपीने लैगिंक अत्याचार केला. ३२ वर्षांची तक्रारदार महिला ही बोरिवली परिसरात राहत असून तिला पाच वर्षांची मुलगी आहे. गुरुवारी रात्री साडेआठ वाजता ती घरात अभ्यास करत होती. यावेळी तिथे आरोपी आला आणि त्याने तिला चॉकलेट देण्याचा बहाणा करुन घराबाहेर आणले. काही वेळानंतर त्याने तिला त्याच्या घरी आणले. त्यानंतर तिची पॅण्ट काढून नकोसा स्पर्श करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि घरी निघून आली. घरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर तिने एमएचबी पोलिसांत आरोपी कारपेंटरविरुद्ध तकार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच काही तासांत आरोपीस पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. बळीत मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात शेजारी राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.