मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – स्वतच्याच सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी एका ४५ वर्षांच्या नराधम पित्याला मानखुर्द पोलिसांनी अटक केली. आरोपीविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पिडीत मुलीला उपचारासाठी सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिथे तिच्यावर मेडीकल होणार आहे. गुरुवारी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
पिडीत मुलगी मानखुर्द परिसरात राहत असून आरोपी हा तिचा पिता आहे. फेब्रुवारी २०१७ साली ती नऊ वर्षांची होती. यावेळी घरात कोणीही नसल्याची संधी साधून तिच्या पित्याने तिच्याशी जवळीक साधून तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. तसेच हा प्रकार कोणालाही सांगू नकोस असे सांगून तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. जिवाच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. त्यानंतर गेल्या नऊ वर्षांपासून तिच्या पित्याकडून तिच्यावर लैगिंक अत्याचार सुरु होता. तिने विरोध केल्यानंतर तो तिला शिवीगाळ करुन मारहाण करत होता. फेब्रुवारी २०१७ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पित्याकडून सुरु असलेल्या लैगिंक अत्याचाराला ती कंटाळून गेली होती. त्यामुळे तिने पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तिने गुरुवारी मानखुर्द पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिच्या पित्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आरोपी पित्याविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला मानखुर्द येथून पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्याला शुक्रवारी पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
मोलकरणीच्या पंधरा वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार
दुसर्या घटनेत मोलकरणीच्या पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मानसिक रुग्ण असलेल्या मुलीवर ५९ वर्षांच्या घरमालकाने लैगिंक अत्याचार केला. ही मुलगी पाच महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच रोहित नावाच्या आरोपीस दिडोंशी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. आरोपी हा मालाड येथे राहत असून तिथेच पिडीत मुलीची आई घरकाम करते. तिची पंधरा वर्षांची पिडीत मुलगी असून ती मानसिक रुग्ण आहे. त्याचाच आरोपीने फायदा घेऊन तिच्याव अनेकदा लैगिंक अत्याचार केला होता. त्यातून ही गरोदर राहिली होती. हा प्रकार नंतर मुलीकडून तिच्या आईला समजताच तिने दिडोंशी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी घरमालकाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन ५९ वर्षांच्या आरोपीस अटक केली. अटकेनंतर त्याला पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
मालाड येथे तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार
मालाड येथील तिसर्या घटनेत एका तीन वर्षांच्या मुलीवर अज्ञात व्यक्तीने लैगिंक अत्याचार केला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध बांगुरनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे. ३६ वर्षांची तक्रारदार महिला मालाड येथे राहत असून बळीत ही तिची मुलगी आहे. बुधवारी १२ फेब्रुवारीला दुपारी दोन वाजता तिने तिला शिक्षणासह देखभालीसाठी एका ठिकाणी सोडले होते. तिथेच एका अज्ञात व्यक्तीने तिच्याशी जवळीक साधून तिच्याशी लैगिंक चाळे केले होते. हा प्रकार नंतर मुलीकडून तिच्या आईला समजताच तिने बांगुरनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सोचा गुन्हा नोंदविला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध सुरु आहे.