तीन वेगवेगळ्या घटनेत तीन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

एका आरोपीस अटक तर पळून गेलेल्या दोघांचा शोध सुरु

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
2 मे 2025
मुंबई, – शहरात तीन वेगवेगळ्या घटनेत तीन अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार झाल्याचा प्रकार गोवंडी, अ‍ॅण्टॉप हिल आणि गोरेगाव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अ‍ॅण्टॉप हिल, देवनार आणि डी. एन नगर पोलिसांनी तीन स्वतंत्र लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांतील एका आरोपीस अ‍ॅण्टॉप हिल पोलिसांनी अटक केली तर पळून गेलेल्या दोघांचा डी. एन नगर आणि देवनार पोलीस शोध घेत आहेत.

36 वर्षांची तक्रारदार महिला ही गोवंडी परिसरात राहते. तिला बारा वर्षांची मुलगी आणि ती शिक्षण घेते. याच परिसरात 50 वर्षांचा आरोपी राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. बुधवारी 30 एप्रिल रात्री बारा ते गुरुवार 1 मे सायंकाळी पावणेपाच या कालावधीत त्याने पिडीत मुलीला त्याच्या घरी आणले आणि तिच्यावर जबदस्तीने वारंवार लैगिंक अत्याचार केला होता. गुरुवारी सायंकाळी पावणेपाच वाजता तिला घरी सोडताना त्याने तिला हा प्रकार कोणालाही सांगू नकोस, नाहीतर तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. घरी आल्यानंतर तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. ही माहिती ऐकून तिला धक्काच बसला होता. त्यानंतर तिने देवनार पोलिसांना ही माहिती दिली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सोचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी घरातून पळून गेला होता. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

दुसर्‍या गुन्ह्यांतील पिडीत मुलगी सतरा वर्षांची असून ती खाजगी नोकरी करते. 25 वर्षांचा आरोपी हा तिच्या परिचित आहे. गुरुवारी 1 मेला त्याने तिला महत्त्वाचे काम आहे, तुझ्याशी बोलायचे आहे असे सांगून जवळच्या एका बोलाविले होते. तिथे त्याने तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. तिचे अश्लील व्हिडीओ काढून तिने हा प्रकार कोणालाही सांगितला तर तिचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. या घटनेनंतर तिने अ‍ॅण्टॉप हिल पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोचा गुन्हा दाखल करुन त्याला काही तासांत अटक केली.

तिसरी घटना गोरेगाव परिसरात घडली. 18 वर्षांची पिडीत मुलगी जोगेश्वरी येथे राहते. 20 वर्षांचा आरोपी तिचा प्रियकर असून त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले होते. लग्नाच्या आमिषाने त्याने तिच्यावर जून ते ऑगस्ट 2024 या कालावधीत गोरेगाव येथील एका रुममध्ये अनेकदा लैगिंक अत्याचार केला होता. त्यातून ती गरोदर राहिली होती. ही माहिती समजताच तो पळून गेला होता. पिडीत मुलीच्या तक्रारीवरुन डी. एन नगर पोलिसांनी आरोपी प्रियकराविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास गोरेगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पिडीत मुलगी गरोदर असल्याने तिच्यावर कूपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page