जुन्या वादातून 18 वर्षांच्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या

हत्येचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या तिघांचा शोध सुरु

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
7 ऑगस्ट 2025
मुंबई, – रिक्षात मैत्रिणीशी अश्लील चाळे करताना पकडून कानशिलात लगावणार्‍या खुशाल ऊर्फ जय गणेश शिंदे या 18 वर्षांच्या तरुणाची तीनजणांच्या टोळीने लाथ्याबुक्यांसह तिक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केल्याची घटना टिळकनगर परिसरात घडली. याप्रकरणी तिन्ही आरोपीविरुद्ध टिळकनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. दिपेश ऊर्फ दिप्या संदीप भोसले, सुमित अनिल सोनावणे आणि कार्तिक ऊर्फ बटर वाघमारे अशी या तिघांची नावे आहेत. हल्ल्यानंतर ते तिघेही पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

ही घटना बुधवारी पहाटे साडेचार वाजता टिळकनगर येथील लोकमान्य टिळक टर्मिनस चौक, प्रतिक्षा सहकारी सोसायटीच्या मागील रस्त्यावर घडली. समाधान रमेश सोनावणे हा चेंबूरच्या सेल कॉलनी, साईबाबा नगर परिसरात राहतो. खुशाल हा त्याचा मित्र असून ते दोघेही एकमेकांना गेल्या तीन वर्षांपासून ओळखतात. 30 जुलैला रात्री दिड वाजता याच परिसरात राहणारे दिप्या आणि सुमीत हे दोघेही एका रिक्षात बसून त्यांच्या मैत्रिणीसोबत अश्लील चाळे करत होते. हा प्रकार काही स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास येताच त्यांनी दोन्ही तरुणांना रिक्षातून बाहेर काढून त्यांच्या कानशिलात लगावली होती. या तरुणीला योग्य ती समज देऊन तिच्या पाठविण्यात आले होते.

यावेळी तिथे खुशाल हादेखील होता. त्याने एका तरुणाच्या कानशिलात लगावून यापुढे अशा प्रकारे अश्लील चाळे करु नका असे सांगितले होते. त्याचा दिप्या आणि सुमीतच्या मनात राग होता. बुधवारी मध्यरात्री तीन वाजता समाधान आणि खुशाल हे दोघेही त्यांच्या बाईकवरुन लोकमान्य टिळक टर्मिनस चौकाजवळ चहा पिण्यासाठी गेले होते. यावेळी तिथे दिपेश, सुमीत आणि कार्तिक आले. खुशालने त्याचा काहीही संबंध नसताना सुमीतच्या कानशिलात लगावली होती यावरुन त्यांनी त्याच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला.

या वादानंतर त्यांनी त्याला बेदम लाथ्याबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर दिप्याने खुशालच्या छातीवर चाकूने भोसकले होते. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. अचानक झालेल्या आरडाओरडानतर ते तिघेही पळून गेले होते. यावेळी समाधानने तिथे उपस्थित रिक्षाचालकाच्या मदतीने खुशालला तातडीने राजााडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच टिळकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी समाधान सोनावणे याच्या तक्रारीवरुन तिन्ही आरोपीविरुद्ध पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. तिघेही पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page