विलेपार्ले येथील टिळक शाळा आरडीएक्सने उडविण्याची धमकी

संपूर्ण शाळेची तपासणी केल्यानंतर ती अफवा असल्याचे उघड

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
26 जून 2025
मुंबई, – गोवंडीतील मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवर कनाकिया इंटरनॅशनल तर कांदिवलीतील ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये रायन इंटरनॅशनल शाळेत बॉम्ब असल्याचा मेल प्राप्त झाल्याची घटना ताजी असताना बुधवारी सायंकाळी विलेपार्ले येथील टिळक शाळा आरडीएक्सने उडवून देणार असल्याचा एक मेल प्राप्त झाल्याचे शाळा प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली होती. मात्र संपूर्ण शाळेची तपासणी केल्यानंतर ती अफवा असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे पोलिसांसह सर्व शिक्षकासह पालक आणि विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. दरम्यान विलेपार्ले पोलिसांनी मेल पाठविणार्‍या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडून संमातर तपास सुरु आहे.

विलेपार्ले पूर्वेला टिळक विद्यालय नावाची एक शाळा आहे. गुरुवारी सायंकाळी सव्वाचार वाजता शाळेला एका अज्ञात व्यक्तीने मेल पाठविला होता. त्यात त्याने टिळक शाळा आरडीएक्सने उडवून देणार असल्याची धमकी दिली होती. हा पाहिल्यानंतर संबंधित अधिकार्‍याने त्याच्या वरिष्ठानां ही माहिती दिली होती. या माहितीनंतर त्यांनी विलेपार्ले पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर काही वेळात स्थानिक पोलिसांसह बॉम्बशोधक व नाशक पथकाचे अधिकारी श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते.

तोपर्यंत संपूर्ण शाळा रिकामी करण्यात आली होती. या पथकाने संपूर्ण शाळेची पाहणी केली होती. मात्र तिथे काहीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही. तपासणीनंतर ती अफवा असल्याचे उघडकीस आले होते. आरडीएक्सच्या धमकीने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र शाळेत काहीही आक्षेपार्ह वस्तू न सापडल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला होता. याप्रकरणी मुख्य सुरक्षा अधिकारी संजय तोणपी यांच्या तक्रारीवरुन विलेपार्ल पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

16 जूनला गोवंडीतील कनाकिया इंटरनॅशनल स्कूल आणि कांदिवलीतील रायन इंटरनॅशनल स्कूल या दोन शाळांना अशाच प्रकाक्षरे मेल आले होते. त्यात शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती.  या धमकीला दहा दिवस उलटत नाहीतर आता पार्ले टिळक शाळा आरडीएक्सने उडविण्याचा मेल प्राप्त झाला होता. या धमकीची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली असून मेल पाठविणार्‍या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर सक्त कारवाई करण्याचे आदेश स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला दिले आहेत. त्यामुळे पोलिसांनी तपासाला सुरुवात केला आहे. तो मेल कोणी आणि कोठून पाठविला याचा तपास सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page