सर्च ऑपरेशनदरम्यानक कॅशसह महत्त्वाचे दस्तावेज जप्त

कार्यालयासह घरावर आर्थिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ जानेवारी २०२५
मुंबई, – कोट्यवधी रुपयांच्या टोरेस कंपनीच्या घोटाळ्याच्या तपासाला आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरु केला असून गुरुवारी दिवसभरात तिन्ही आरोपींच्या घरासह मुंबईतील तीन शाखांमध्ये पोलिसांनी अचानक सर्च ऑपरेशन हाती घेतले होते. या कारवाईदरम्यान कोट्यवधी रुपयांची कॅशसहीत स्टोन, महत्त्वाचे दस्तावेज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. जप्त केलेल्या कॅश मोजण्याची प्रक्रिया सुरु असून अंदाजे अडीच ते तीन कोटी रुपयांची कॅश असल्याचे बोलले जाते. आगामी दिवसांत अशाच प्रकारे काही ठिकाणी सर्च ऑपरेशन हाती घेतले जाणार आहे. गुंतवणुकदारांची तक्रार नोंदविण्यासाठी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात एक विशेष सेलची स्थापना करण्यात आली असून फसवणुक झालेल्या गुंतवणुकदारांनी त्यांची माहितीसह फसवणुकीची डिटेल्स तिथे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गुन्हा दाखल करताना १३ कोटी ४८ लाखांची फसवणुक झाल्याचे नमूद करण्या आले होते, मात्र दिवस आलेल्या तक्रारीनंतर त्यात पाच कोटीच्या फसवणुकीची भर पडली आहे. त्यामुळे फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आला आहे. या गुन्ह्यांच्या तपासासाठी काही विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली असून एका पथकाला गुंतवणुकदारांची माहिती गोळा करण्याचे काम सोपविण्यात आले तर इतर पथक तपासकामी विविध ठिकाणी रवाना झाले आहेत. या गुन्ह्यांत दोन मुख्य आरोपीसह इतर काही आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

टोरेस कंपनीतील कोटयवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस येताच तीन दिवसांपूर्वी शिवाजी पार्क पोलिसांनी कंपनीच्या संचालकासह इतर पदाधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच काही तासांत संचालक सर्वेश अशोक सुर्वे, महाव्यवस्थापक तानिया कसातोवा आणि स्टोअर इंचार्ज व्हेलेंटिना कुमार या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत ते तिघेही पोलीस कोठडीत आहे. या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे या गुन्ह्यांत अटक केलेल्या तिन्ही आरोपींची आता संंबंधित पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुलाबा, ऑपेरा हाऊस, डोबिंवली, एन. एम जोशी मार्ग, गिरगाव आणि दादर येथील तीन कार्यालयासह सर्वेश याच्या उमरखाडी, तानियाच्या कुलाबा आणि व्हेलेंटिनाच्या डोबिवली येथील घरावर सर्च ऑपरेशन हाती घेतले होते. यासंदर्भात माहिती देताना पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले की, गुरुवारी सहा ठिकाणी सर्च ऑपरेशन हाती घेण्यात आले होते. आगामी काळात अशाच प्रकारे सर्च ऑपरेशन केले जाणार आहे.

या ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी काही कॅश, गुंतवणुकीसंदर्भातील महत्त्वाचे दस्तावेज, काही स्टोन, पॅमप्लेट, बॅगा सापडल्या आहेत. कॅश मोजण्याचे काम सुरु आहे. टोरेस कंपनीने अलीकडेच एक गुंतवणुक योजना सुरु केली होती. त्यात गुंतवणुकदारांना स्टोन देऊन गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले जात होते. एकाच कार्डचे फॉरमेट सर्टिफिकेट दिले जात होते. या गुंतवणुकीला त्यांना दर आठवड्यात तीन ते आठ टक्के परतावा दिला जात होता. गुंतवणुकदारांना इतरांना गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. त्यासाठी त्यांना ठराविक रक्कमेचे कमिशनसह लकी ड्रॉद्वारे फ्लॅटसह महागड्या कारचे गिफ्टचे आमिष दाखविण्यात आले होते. आतापर्यंत कंपनीने पंधरा गुंतवणुकदारांना पंधरा महागड्या कारचे वितरण केले आहे. त्यामुळे कंपनीवर अनेक गुंतवणुकदाराचा विश्‍वास बसला होता. त्यातून अनेकांना कंपनीच्या या योजनेत कोट्यवधी रुपयांची गुंतवणुक केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा खुलासा झाला आहे. त्यांच्याकडून येत आलेल्या माहितीवरुन पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. या गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असल्याचेही पोलीस उपायुक्त निशानदार यांनी सांगितले.

शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात एका विशेष सेलची स्थापना करण्यात आली आहे. मुंबईत फसवणुक झालेल्या गुंतवणुकदारांनी तिथे आपली तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यात त्यांची माहिती, किती रुपयांची गुंतवणुक केली, केव्हा गुंतवणुक केली, त्यांना किती रुपयांचा परतावा मिळाला होता याबाबत माहिती एका एमपीआयडीचा फॉर्म भरुन द्यायचा आहे. एफआयआरमध्ये कंपनीचे संचालक सर्वेश अशोक सुर्वे, व्हिक्टोरिया कोवालेन्को, सीईओ तौफिक रियाज ऊर्फ जॉन कारटर, महाव्यवस्थापक तानिया कॅसोतोवा आणि स्टोर इंचार्ज व्हॅलेंटीना कुमार यांच्याविरुद्ध १३ कोटी ४८ लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. मात्र गेल्या तीन दिवसात आलेल्या तक्रारीनंतर हा आकडा पाच कोटींनी वाढला आहे. त्यामुळे आता फसवणुकीची रक्कम सुमारे १९ कोटी झाली असून हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गुंतवणुकीना फसवणुकीची रक्कम परत मिळावी यासाठी कायदेशीर मार्गाने प्रयत्न केले जाणार आहे. कंपनीने कार्यालय सुरु करण्यासाठी काही जागा भाड्याने घेतल्या होत्या. त्याचाही तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिन्ही आरोपींच्या चौकशीतून त्यांच्या इतर पाच सहकार्‍यांची नावे समोर आली आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page