मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ जानेवारी २०२४
मुंबई, – टोरेस कंपनीच्या दादर शाखेचे कार्यालय सुरु करण्यासाठी कंपनीच्या संचालक दरमाह २५ लाख रुपयांचे भाडे देत असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या हाती आलेल्या कागदपत्रावरुन उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत आतापर्यंत पोलिसांनी सुमारे नऊ कोटीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. शनिवारीही अनेक गुंतवणुकदारांनी फसवणुक झाल्याचे सांगत तक्रार करण्यासाठी शिवाजी पार्कच्या विशेष सेलमध्ये रांगा लावल्या होत्या. आतापर्यंत सातशेहून अधिक गुंतवणुकदारांची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली असून फसवणुकीचा हा आकडा २५ कोटीवर पोहचला आहे. अजूनही काही गुंतवणुकदार तक्रार करण्यासाठी पुढे येत असल्याने हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुसरीकडे ज्या गुंतवणुकदारांना लकी ड्रॉच्या माध्यमातून महागड्या कार देण्यात आले होते, त्या सर्व कार लवकरच हस्तगत केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
टोरेस कंपनीतील कोटयवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस येताच शिवाजी पार्क पोलिसांनी कंपनीच्या संचालकासह इतर पदाधिकार्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच काही तासांत संचालक सर्वेश अशोक सुर्वे, महाव्यवस्थापक तानिया कसातोवा आणि स्टोअर इंचार्ज व्हेलेंटिना कुमार या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत ते तिघेही पोलीस कोठडीत आहे. अटकेच्या कारवाईनंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विविध ठिकाणी सर्च ऑपरेपन केले होते. त्यात टोरेस कार्यालयासह तिन्ही आरोपींच्या घरांचा समावेश आहे. या कारवाईत आतापर्यंत पोलिसांनी सुमारे नऊ कोटीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात पाच कोटीची कॅश, सोन्याचे दागिने, कडे, चांदीचे दागिने आदींचा समावेश आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आतापर्यंत सातशे गुंतवणुकदारांची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली आहे. या तक्रारीनंतर फसवणुकीची रक्कम २५ कोटीपर्यंत पोहचली आहे.
गुन्हा दाखल होण्यापूर्वी आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर आतापर्यंत दिड हजार गुंतवणुकदारांनी तक्रार केली आहे. आगामी दिवसांत आणखीन काही गुंतवणुकद तक्रार नोंदविण्यासाठी येत असल्याने हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ज्या गुंतवणुदारांनी स्वतसह इतरांना कंपनीत गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले. त्यांना कोेट्यवधी रुपयांची गुंतवणुक करण्यास भाग पाडले, अशा काही लकी गुंतवणुकदारांना लकी ड्रॉद्वारे चौदा कारचे वाटप करण्यात आले होते. या सर्वांची नावे पोलिसांना समजली असून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठविण्यात आले आहे. या गुंतवणुकदारांना आयफोनसह गोल्ड रिंग दिल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे. त्याचा पोलिसांकडून तपास ुसुरु आहे. त्यांच्या चौकशीतून अनेक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दादर येथील टोरेस कार्यालय भाड्याने घेण्यात आले होते. तळमजला अधिक दोन मजल्याचे ११ हजार ५०० स्न्वेअर फुटाचे संबंधित कार्यालय असून त्यासाठी कंपनीकडून भाड्यापोटी दरमाह २५ लाख रुपये दिले जात असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. भाडेकरार करणार्या मालकासह एजंटचीही लवकरच पोलिसाकडून चौकशी होणार आहे. ओलेना स्टोयन आणि व्हॅलेंटीना कुमार या दोघीही युक्रेनच्या नागरिक आहेत. डिसेंबर महिन्यांत त्या दोघीही ख्रिसमसचा बहाणा करुन युक्रेनला पळून गेल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या संपूर्ण कटात त्या दोघीही मुख्य आरोपी असून त्यांनी युके्रन येथे अशाच प्रकारे गुंतवणुक योजना सुरु केल्याचे बोलले जाते. या योजनेची माहिती आर्थिक गुन्हे शाखेकडून माहिती घेतली जात आहे. दरम्यान या दोघींच्या अटकेसाठी मुंबई पोलिसकडून लवकरच रेड कॉर्नर नोटीस बजाविली जाणार आहे.