पैशांसाठी पत्नीला पतीनेच अकरा वर्ष वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले

एक कोटीचा अपहार केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
15 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – पैशांसाठी पत्नीचा पतीनेच मानसिक व शारीरिक शोषण करुन तिला अकरा वर्ष जबदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याची धक्कादायक घटना ट्रॉम्बे परिसरात उघडकीस आली आहे. इतकेच नव्हे तर वेश्याव्यवसायातून तिने जमा केलेल्या सुमारे एक कोटीचा तिच्या पतीसह दिर आणि नणंद यांनी संगनमत करुन अपहार करुन तिची फसवणुक केली. याप्रकरणी एकाच कुटुंबातील तिन्ही आरोपीविरुद्ध ट्रॉम्बे पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून तक्रारदार महिलेच्या पतीसह दिर आणि नणंद या तिघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

29 वर्षांची तक्रारदार महिला ही नवी मुंबईतील तळोजा परिसरात राहते. 2014 रोजी तिचे अकबर नावाच्या एका तरुणासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर ती तिच्या ट्रॉम्बे येथील चिता कॅम्पमधील सासरी आली होती. लग्नानंतर तिला तिचा पती काहीच कामधंदा करत नसून तो बेरोजगार आहे. त्याला नशा करण्याचे व्यसन आहे. त्यामुळे घरखर्चासाठी तो तिच्या वडिलांकडून पैशांची ामगणी करत होता. चार वर्ष तिच्या वडिलांनी तिला घरखचार्र्साठी अनेकदा पैसे दिले होते. मात्र 2018 तिच्या पक्षाघात झाल्याने त्यांचे काम बंद झाले होते. त्यामुळे त्यांनी पैसे देणे बंद केले होते.

2019 साली तिच्या पतीसह नणंदने तिला घर चालविण्यासाठी तिला काम करण्याचा सल्ला दिला होता. चेन्नई येथील कपड्याच्या कंपनीत नोकरी असल्याने तिच्या नणंदने तिला नोकरीसाठी चेन्नईला नेले होते. मात्र कपड्याच्या कंपनीत नोकरीवर न ठेवता तिने तिला एका मसाज पार्लरमध्ये कामावर ठेवले. तिथे काम करताना तिला मसाज पार्लरमध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती समजली होती. त्यामुळे तिने तिथे काम करण्यास नकार दिला. मात्र तिच्या नणंदने घरखर्चासाठी काम करावे लागेल असे सांगून तिला जबदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले. मसाज पार्लरमध्ये काम करताना तिला दररोज चार ते सहा हजार रुपये मिळत होते.

ही रक्कम ती तिच्या नणंदकडे जमा करत होती. 2023 पर्यंत चेन्नईतील मसाज पार्लरमध्ये काम केल्यानंतर मणक्याचा त्रास होऊ लागल्याने ती मुंबईत निघून आली होती. यावेळी तिचा पती आणि नणंद तिला दुसर्‍या पार्लरमध्ये काम करण्यास सांगत होती. त्यानंतर तिने तिला वापी येथील मसाज पार्लरमध्ये कामावर ठेवले होते. तिथेही मसाजच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालत होता. जून 2025 पर्यंत तिने तिथे काम केले. त्यानंतर ती पुन्हा मुंबईत आली होती. 2019 ते 2025 या कालावधीत तिने तिच्या नणंदला ऑनलाईन एक कोटी रुपये पाठविले होते. ही रक्कम तिच्या पतीसह दिर आणि नणंदने आपसांत वाटून घेतले होते.

ठरल्याप्रमाणे तिला अर्धी देणे ठरले होते, मात्र त्यांनी तिला पैसे देण्यास नकार दिला. पैशांची मागणी केल्यानंतर तो तिला मारहण करत होता. तिने वेश्यावसाय करण्यास नकार देताच त्यांनी तिचा मानसिक व शारीरिक शोषण केले होते. त्यामुळे तिने त्याच्याशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तिने घटस्फोटासाठी भिवंडीतील फॅमिली कोर्टात अर्ज केला होता. या अर्जानंतर त्यांचा घटस्फोट झाला होता. घटस्फोटानंतर ती तिच्या दोन्ही मुलांना घेऊन तिच्या माहेरी आली होती. मात्र तिच्या पतीसह दिर आणि नणंदने तिच्या दोन्ही मुलांना तिच्यापासून वेगळे केले होते. दोन्ही मुलांना ते तिघेही घेऊन गेल्यानंतर तिने पोलिसांत तक्रार करण्याचा प्रयत्न केला,

मात्र पोलिसांनी तिला कोर्टात दाद मागण्याचा सल्ला दिला होता. या घटनेनंतर तिने तिथे उपस्थित पोलिसांना तिच्या पतीसह दिर आणि नणंदने पैशांसाठी तिला अकरा वर्ष वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले, वेश्याव्यवसायातून तिची सुमारे एक कोटीचा अपहार केल्याचा आरोप करुन त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या संपूर्ण घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत त्याचा तपास करण्याचे आदेश दिले होते. तपासात तक्रारदार महिलेच्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आले होते.

त्यानंतर तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिच्या पतीसह दिर आणि नणंदविरुद्ध पैशांसाठी मानसिक व शारीरिक शोषण करुन तिला जबदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करणे, तिच्या पैशांचा अपहार करुन फसवणुक करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या तिघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. त्यांच्या चौकशीतून त्यांना मदत करणार्‍या इतर दोषींवर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page