हत्येच्या प्रयत्नासह लैगिंक अत्याचाराच्या गुन्ह्यांतील आरोपींना कारावास

तिन्ही आरोपींना आठ व दहा वर्षांच्या कारावासह दंडाची शिक्षा

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – गोवंडीतील देवनार परिसरात झालेल्या हत्येच्या प्रयत्नाचा तर चेंबूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवरील झालेल्या लैगिंक अत्याचाराच्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांत तीन आरोपींना विशेष सेशन कोर्टाने कारावासाची सुनावली आहे. यातील आकाश विद्याधर डावरे व विकास फुलचंद जैस्वाल यांना हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत आठ वर्षांच्या कारावासासह 35 हजाराचा दंड तर लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या गुन्ह्यांत शुभम अशोक तायडे याला दहा वर्षांची सक्तमजुरीसह पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास त्यांना अनुक्रमे एक वर्षांचा आणि तीन महिन्यांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.

चार वर्षांपूर्वी गोवंडीतील देवनार परिसरात एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात संबंधित व्यक्ती गंभीररीत्या जखमी झाला होता. याप्रकरणी देवनार पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवून आकाश डावरे आणि विकास जैस्वाल या दोघांना अटक केली होती. या दोघांविरुद्ध नंतर पोलिसांनी विशेष सेशन कोर्टात आरोपपत्र सादर केले होते. या खटल्याची सुनावणी अलीकडेच पूर्ण झाली होती. यावेळी कोर्टाने दोन्ही आरोपींना सबळ पुराव्याच्या आधारे दोषी ठरविले होते. त्यानंतर आकाश डावरे आणि विकास जैस्वाल यांना आठ वर्षांच्या कारावासासह 35 हजार रुपयांचा दंड, दंडाची रक्कम न भरल्यास त्यांना एक वर्ष अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.

या गुन्ह्यांचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश यादव, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुपे, पोलीस निरीक्षक हरिभाऊ बानकर यांनी तपास केला तर कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक सुनिल सूर्यवंशी, महिला पोलीस शिपाई कदम, लोंढे पोलीस शिपाई ईश्वरकर यांनी कामकाज पाहिले.

दुसर्‍या गुन्ह्यांत एका अल्पवयीन मुलीवर शुभम तायडे याने लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याच्याविरुद्ध चेंबूर पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह जिवे मारण्याची धमकी देणे तसेच पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर त्याचविरुद्ध आरोपपत्र सादर करण्यात आले होते. या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन कोर्टाने आरोपीला दोषी ठरविले होते. त्यानंतर त्याला पुरावा तसेच साक्षीदारांनी दिलेल्या जबानीवरुन कोर्टाने दहा वर्षांची सक्तमजुरी, पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास त्याला आणखीन तीन महिने कारावास भोगावा लागणार आहे.

अतिरिक्त पोलीस आयुक्त महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवळे, तपास अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक ललित दळवी यांनी तपास केला तर कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक संजय कुंभार, सहाय्यक फौजदार म्हात्रे, पोलीस हवालदार म्हात्रे, महिला पोलीस शिपाई माळी यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page