मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
18 सप्टेंबर 2025
मुंंबई, – शहरात दोन वेगवेगळ्या घटनेत सोळा आणि तेरा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर त्यांच्याच परिचित आरोपींनी लैगिंक अत्याचार केल्याची घटना मालाड आणि जोगेश्वरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी मालवणी आणि आंबोली पोलिसांनी दोन स्वतंत्र लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन एका आरोपीस अटक केली त दुसर्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. दोन्ही पिडीत अल्पवयीन मुलींना मेडीकलसाठी कूपर आणि नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
पहिल्या गुन्ह्यांतील तेरा वर्षांची पिडीत मुलगी मालाडच्या मालवणी परिसरात राहते. तिच्या परिचित आश्रफ नावाचा एक तरुण आहे. त्याने तिला त्याच्या प्रेम जाळ्यात खेचून तिच्यावर प्रेम असल्याचा दावा केला होता. तिच्याशी गोड बोलून तिला एका निर्जनस्थळी बोलाविले होते. जानेवारी ते ऑगस्ट 2025 या कालावधीत त्याने तिच्यावर अनेकदा लैगिंक अत्याचार केला होता. त्यातून ती गरोदर राहिली होती. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेनंतर तिच्या पालकांनी तिला मालवणी पोलीस ठाण्यात आणले होते. तिथे तिने घडलेला प्रकार सांगून आरोपी तरुणाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आश्रफ या 19 वर्षांच्या आरोपी तरुणाविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
दुसरी घटना जोगेश्वरी परिसरात घडली. 39 वर्षांचे तक्रारदार जोगेश्वरी परिसरात राहत असून सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. पिडीत त्यांची सोळा वर्षांची मुलगी आहे. मे महिन्यांत आरोपीने पिडीत मुलीशी त्याच्या राहत्या घरी जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. तसेच हा प्रकार कोणालाही सांगू नकोस म्हणून तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. काही दिवसांनी त्याने तिला त्याच्या घरी घरकामासाठी ठेवले होते. तिथे काम करताना त्याने तिच्यावर अनेकदा जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार अलीकडेच पिडीत मुलीकडून तिच्या तक्रारदार पित्याला समजला होता. त्यानंतर त्याने आंबोली पोलिसांत आरोपी राकेशविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह धमकी देणे आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच आरोपीस त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली. हा गुन्हा जोगेश्वरीच्या हद्दीत घडल्याने गुन्ह्यांचा तपास ओशिवरा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर आरोपीला दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. पिडीत मुलीला वैद्यकीय उपचारासाठी कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिथेच तिची मेडीकल केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.