आठ वर्षांच्या मुलीशी अश्‍लील वर्तन करुन विनयभंग

वांद्रे येथील घटना; ४० वर्षांच्या आरोपीस अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ सप्टेंबर २०२४
मुंबई, – आठ वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी अश्‍लील वर्तन करुन तिचा विनयभंग झाल्याचा प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी लवकुश शिवकुमार नावाच्या एका ४० वर्षांच्या आरोपीस वांद्रे पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत त्याला विशेष सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

३७ वर्षांचे तक्रारदार वांद्रे येथे राहत असून त्यांचा कपड्याचे एक दुकान आहे. आठ वर्षांची बळीत त्यांची मुलगी आहे. मंगळवारी ही मुलगी वांद्रे येथून जात होती. यावेळी लवकुश या आरोपीने तिच्याकडे पाहून अश्‍लील हातवारे केले होते. त्यानंतर त्याने स्वतची पॅण्ट काढून तिच्याशी अश्‍लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला. घडलेला प्रकार तिने तिच्या वडिलांना सांगितला. त्यानंतर त्यांनी वांद्रे पोलिसांना घडलेला प्रकार सांगून लवकुशविरुद्ध तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत मंगळवारी रात्री उशिरा लवकुशला पोलिसांनी अटक केली. आरोपी माटुंगा येथे राहत असून त्याचा कॅटरिंगचा व्यवसाय असल्याचे पोलिसांनी सांगितले.
लोकलमध्ये कॉलेज तरुणीचा विनयभंग
अन्य एका घटनेत लोकलमध्ये एका कॉलेज तरुणीचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकात विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच इब्राहिम मुस्ताक शेख या आरोपीस अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. बळीत तरुणी विक्रोळी येथे राहत असून नागपाड्यातील एका नामांकित कॉलेजमध्ये शिकते. बुधवारी ती तिच्या वडिलांसोबत कॉलेजला जात होती. यावेळी दादर येथून चढलेल्या एका प्रवाशाने लोकलमध्ये असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन तिला अश्‍लील स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार तिच्या वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी इतर प्रवाशांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला तिथे रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. याप्रकरणी बळीत तरुणीच्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page