अकरा व तेरा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग
विनयभंगासह पोक्सोच्या दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२ डिसेंबर २०२४
मुंबई, – अकरा व तेरा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याचा प्रकार ऍण्टॉप हिल आणि मालाड परिसरात घडली. याप्रकरणी ऍण्टॉप हिल आणि मालाड पोलिसांनी दोन स्वतंत्र विनयभंागससह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवून एका आरोपीस अटक केली तर दुसर्या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
अकरा वर्षांची बळीत मुलगी पवई परिसरात राहते. रविवारी तिची आई, मामा आणि त्याची पत्नी घरात होते तर ती रात्री साडेअकरा वाजता खाऊ आणण्यासाठी दुकानात गेली होती. मात्र दुकान बंद झाल्याने ती तिच्या घरी येत होती. यावेळी ३२ वर्षांच्या आरोपीने तिच्याशी अश्लील संभाषण केले होते. माझ्यासोबत चल, तुला जेवण आणि पैसे देतो असे सांगून त्याने तिला पकडून जोरात मिठी मारली. तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि तिने तिच्या आईला हा प्रकार सांगितला. त्यानंतर तिने पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपीस पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दुसर्या घटनेत मालाड येथे एका दहा वर्षांच्या मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी परेण अनिल बर्मन या ३८ सुरक्षारक्षकाविरुद्ध मालाड पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. बळीत मुलगी तिच्या पालकांसोबत मालाड येथे राहते. रविवारी १ डिसेंबरला सायंकाळी सव्वासहा वाजता आरोपीने मुलीच्या पोटावरुन अश्लील स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार तिच्या आईला समजताच तिने आरोपीविरुद्ध मालाड पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपीस ३५ (३) नोटीस देऊन सोडून देण्यात आले.