दादर येथे पित्याकडून तर पवईत चुलत्याकडून विनयभंग

दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद तर आरोपी चुलत्याला अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
11 एप्रिल 2025
मुंबई, – दादर येथे पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा तिच्याच जन्मदात्या पित्याने तर पवईत बारा वर्षांच्या मुलीवर तिच्याच चुलत्याने विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दादर आणि पवई पोलिसांनी दोन स्वतंत्र विनयभंगासह पोक्से कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत 30 वर्षांच्या आरोपी चुलत्याला पवई पोलिसांनी अटक केली तर 51 वर्षांच्या पित्याची पोलिसकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे.

29 वर्षांची तक्रारदार महिला ही घरकाम करत असून ती तिच्या कुटुंबियाांसेबत पवई परिसरात राहते. तिला बारा वर्षांची मुलगी असून आरोपी हा तिचा दिर आहे. गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता आरोपीने तिच्या मुलीशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करुन तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. तिने हात झटकला असता त्याने तिच्या कानशिलात लगावली होती. तसेच जबदस्तीने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. तिला किस करुन तिच्या छातीला नकोसा स्पर्श केला होता. हा प्रकार मुलीकडून तिच्या आईला समजताच तिने आरोपी दिराविरुद्ध पवई पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच आरोपी दिराला पोलिसांनी अटक केली.

दुसर्‍या घटनेत आईला मॅसेज पाठविला म्हणून जन्मदात्या पित्याने स्वतच्या पंधरा वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला. बळीत मुलगी ही दादर येथे तिच्या आरोपी पित्यासोबत राहते. मार्च महिन्यांत तिने त्यांच्या मोबाईलमधील एक मॅसेज तिच्या आईला पाठविला होता. याच कारणावरुन त्याने स्वतच्या मुलीला रुममध्ये आणले आणि तिच्याशी अश्लील संभाषण केले होते. माणसाला काही शारीरिक गरजा असतात, तुला नाही समजणार. घर मे खाना नही मिला तो बाहेर जायेगा ही ना असे बोलून तिच्या पाठीवरुन अश्लील स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. सुरुवातील तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र नंतर तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर तिने तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर तिने गुरुवारी दादर पोलीस ठाण्यात जाऊन तिच्या वडिलांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची दादर पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपी पित्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांचा तपास सुरु असून आरोपी पित्याची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page