मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
30 एप्रिल 2025
मुंबई, – सोशल मिडीयावरुन दोन अल्पवयीन मुलीचा मानसिक शोषण करुन अश्लील मॅसेज आणि फोटो पाठवून विनयभंग केल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहे. याप्रकरणी भायखळा आणि दिडोंशी पोलिसांनी विनयभंगासह पोक्सोच्या दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद केली आहे. यातील एका गुन्ह्यांत सतरा वर्षांच्या मुलाला भायखळा पोलिसांनी ताब्यात घेऊन डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविले तर दुसर्या अज्ञात व्यक्तीचा दिडोंशी पोलिसांकडून शोध सुरु आहे.
पहिल्या गुन्ह्यांतील तक्रारदार महिला ही भायखळा परिसरात राहते. तिला पंधरा वर्षांची एक मुलगी असून ती सध्या शिक्षण घेत आहेत. याच परिसरात सतरा वर्षांचा आरोपी राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. गेल्या वर्षी जुलै महिन्यांत आरोपीने बळीत मुलीला सोशल मिडीयावर काही अश्लील मॅसेज पाठविले होते. तिच्याशी अश्लील संभाषण करुन जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. तिचे अश्लील फोटो पाठविण्याची विनंती केली होती. सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते, मात्र आरोपी तिचा सतत सोशल मिडीयाच्या माध्यमातून पाठलाग करुन तिला त्रास देण्याचा प्रयत्न करत होता. एप्रिल महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात ही मुलगी इमारतीच्या गेटवर तिच्या वडिलांची वाट पाहत होता.
यावेळी तिथे आरोपी मुलगा आला आणि त्याने तिच्याकडे पाहून अश्लील इशारे केले होते. तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. तिला सोशल मिडीयावरुन अश्लील फोटो पाठविले होते. जुलै 2024 आणि एप्रिल 2025 या कालावधीत त्याने तिला अनेका मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तिने तिच्या आईला हा सांगून भायखळा पोलीस ठाण्यात आरोपी मुलाविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच सतरा वर्षांच्या आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तो अल्पवयीन असल्याने त्याला नंतर डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते.
दुसरी घटना मालाड परिसरात घडली. सोळा वर्षांची बळीत मुलगी मालाड परिसरात राहते. सोमवारी रात्री ती तिच्या घरी होती. यावेळी तिला एका अज्ञात व्यक्तीने तिचा चेहरा असलेला अश्लील मॉर्फ फोटो पाठविला होता. तिचा मॉर्फ केलेला फोटो तिच्या कुटुंबियांसोबत नातेवाईकांना व्हायरल करण्याची धमकी दिली होती. इतकेच नव्हे तर तिचा व्हॉटअप क्रमांक वेगवेगळ्या व्हॉटअप ग्रुपमध्ये जोडून तिचे अश्लील न्यूड फोटो ग्रुप आयकॉनमध्ये सेव्ह करुन तिची बदनामी केली होती. हा प्रकार तिने दिडोंशी पोलिसांना सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन अज्ञात व्यक्तीचा शोध सुरु केला आहे. आरोपी बळीत मुलीच्या परिचित असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे तिच्या सर्व मित्रमैत्रिणीची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे.