बोरिवलीत मुलीचा सुरक्षारक्षक तर गोवंडीत मित्रांकडून मैत्रिणीचा विनयभंग
दोन स्वतंत्र विनयभंगासह पोक्सोच्या गुन्ह्यांची नोंद
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
20 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – बोरिंगचे पाणी बंद करण्याचा निरोप घेऊन गेलेल्या सुरक्षारक्षकानेच केबीनमध्ये एका नऊ वर्षांच्या अल्पयीन मुलीवर तर गोवंडी सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मैत्रिणीचा तिच्याच मित्राने अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बोरिवली आणि गोवंडी पोलिसांनी दोन स्वतंत्र विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
पहिल्या गुन्ह्यांतील 39 वर्षांचे तक्रारदार बोरिवली येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांची नऊ वर्षांची बळीत मुलगी आहे तर आरोपी त्याच्याच सोसायटीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. बुधवारी 15 ऑक्टोंबरला रात्री पावणेनऊ वाजता त्यांची मुलगी सोसायटीमध्येच खेळत होती. खेळता खेळता ती बोरिंगचे पाणी बंद करण्याचा निरोध घेऊन आरोपीच्या केबीनमध्ये गेली होती. याच केबीनमध्ये आरोपीने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. या प्रकारानंतर ती प्रचंड घाबरली आणि तिने घडलेला प्रकार तिच्या वडिलांना सांगितला. त्यानंतर तक्रारदाराने घडलेला प्रकार बोरिवली पोलिसांना सांगून आरोपी सुरक्षारक्षकाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी सुरक्षारक्षकाविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपी सुरक्षारक्षक तेथून पळून गेला होता.
दुसरी घटना गोवंडी परिसरात घडली. सोळा वर्षांची अल्पवयीन मुलगी ही मानखुर्द परिसरात राहते. 22 वर्षांचा आरोपी तिचा मित्र आहे. 7 सप्टेंबर 2025 रोजी ती त्याच्यासोबत चेंबूरच्या के स्टार मॉलमध्ये सिनेमा पाहण्यासाठी गेली होती. यावेळी सिनेमा पाहताना त्याने तिला प्रपोज करुन तिला लग्नाची मागणी घातली होती. सिनेमागृहात असलेल्या अंधाराचा फायदा घेऊन त्याने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. या घटनेने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. सुरुवातीला तिने बदनामीच्या भीतीने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र दोन दिवसांपूर्वी तिने गोवंडी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी मित्राविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले.