अकरा व सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलींवर लैगिंक अत्याचार
बोरिवली-आग्रीपाड्यातील घटना; दोन्ही आरोपींना अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ जुलै २०२४
मुंबई, – शहरात दोन वेगवेगळ्या अकरा आणि सोळा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलीवर त्यांच्याच परिचित व्यक्तींकडून लैगिंक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या दोन्ही घटना बोरिवली आणि आग्रीपाडा परिसरात घडल्या. याप्रकरणी एमएचबी आणि आग्रीपाडा पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. अटकेनंतर या दोघांनाही विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन्ही पिडीत मुलींची मेडीकल करण्यात आली असून लवकरच आरोपींची मेडीकल होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यातील पहिल्या गुन्ह्यांतील तक्रारदार महिला ही भायखळा येथे राहते. तिची अकरा वर्षांची पिडीत मुलगी भाची असून ती याच परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. २६ वर्षांचा आरोपी तिचा आतेजावई असल्याने पिडीत मुलगी त्याच्या परिचित होती. गेल्या दोन महिन्यांपासून आरोपी पिडीत अकरा वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे करुन तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार करत होता. हा प्रकार तिने कोणालाही सांगू नये म्हणून तो तिला तिच्या बहिणीला मारहाण करण्याची धमकी देत होता. त्यामुळे तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. गेल्या दोन महिन्यांपासून त्याच्याकडून तिचा मानसिक व शोषण शोषण सुरु होता. त्याला कंटाळून तिने हा प्रकार तक्रारदार महिलेला सांगितला. ही माहिती ऐकून तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिने तिला आग्रीपाडा पोलीस ठाण्यात आणून तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. या महिलेच्या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी आरोपी आतेजावयाविरुद्ध ३७६ (२), (एफ), (ब), (३), ५०६ भादवी सहकलम ६, १० पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच २६ वर्षांच्या आरोपीस पोलिसांनी अटक केली.
दुसरी घटना बोरिवली परिसरात घडली. घरात कोणीही नसल्याची संधी साधून एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच परिचित आरोपीने लैगिंक अत्याचार केला होता. पिडीत अल्पवयीन मुलगी ही बोरिवली परिसरात राहत असून ती घरकाम करते. शनिवारी रात्री अकरा वाजता ती तिच्या घरी होती. यावेळी तिच्या परिचित आरोपी तिथे आला आणि त्याने जबदस्तीने तिच्या घरात प्रवेश केला. घरात कोणीही नसल्याची संधी साधून त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली होती. त्यानंतर तो तेथून पळून गेला होता. हा प्रकार नंतर तिने पोलिसांना सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी ३७६, ४४८, ५०६ (२) भादवी सहकलम ४, ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच काही तासांत साडी विक्रेता असलेल्या ४२ वर्षांच्या आरोपीस पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही लोकल विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोन्ही घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.