दोन घटनेत तीन अल्पवयीन मुलींवर लैगिंक अत्याचार

दोन अल्पवयीन मुलांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – सायन आणि कुर्ला येथील दोन वेगवेगळ्या घटनेत तीन अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी धारावी आणि चुन्नाभट्टी पोलिसांनी दोन स्वतंत्र लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यातील एका गुन्ह्यांतील चौदा आणि सतरा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांना चुन्नाभट्टी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविले तर दुसर्‍या गुन्ह्यांतील आरोपी तरुण पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी धारावी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

४६ वर्षांचे तक्रारदार शिक्षक असून ते सायन परिसरात राहतात. आठ वर्षांची बळीत त्यांची मुलगी असून दुसरी पाच वर्षांची बळीत मुलगी त्यांच्या चुलत भावाची मुलगी आहे. सोमवारी सायकाळी सात वाजता या दोन्ही मुली त्यांच्या घराजवळ खेळत होत्या. यावेळी तिथे सोहेल नावाचा एक २५ वर्षांचा तरुण आला. त्यानंतर या दोन्ही मुलींना घराजवळील एका वाहनाच्या मागे आणले. तिथे त्याने त्यांच्याशी जवळीक साधून अश्‍लील चाळे केले. त्यानंतर त्यांच्या गुप्त भागावर अश्‍लील चाळे केले होते. या प्रकारानंतर त्या दोघीही घाबरल्या आणि घरी आल्या होत्या. घरी आल्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार तक्रारदारांना सांगितला होता. त्यानंतर त्यांनी धारावी पोलिसांना हा प्रकार सांगून सोहेल या तरुणाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच सोहेल हा पळून गेला असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. याच परिसरात एक कारखाना असून तिथेच सोहेल हा कामाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. सोमवारी सायंकाळी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

कुर्ला येथील दुसर्‍या घटनेत एका चार वर्षांच्या मुलीचा दोन अल्पवयीन मुलांनी लैगिंक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चुन्नाभट्टी पोलिसांनी चौदा आणि सतरा वर्षांच्या दोन्ही आरोपी मुलांविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ताब्यात घेतलेल्या या दोघांनाही नंतर डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. तक्रारदार महिला ही कुर्ला येथे राहत असून तिला चार वर्षांची मुलगी आहे. दोन्ही आरोपी मुले याच परिसरात राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. शनिवारी रात्री नऊ वाजता या दोन्ही पिडीत मुलीला जवळच्या दर्ग्याजवळील मातीच्या ढिगार्‍यासमोर आणले होते. तिथे त्यांनी तिचे कपडे काढून तिच्याशी अश्‍लील चाळे करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार नंतर मुलीकडून तिच्या आईला समजताच तिला धक्काच बसला होता. त्यानंतर तिने घडलेला प्रकार चुन्नाभट्टी पोलिसांना सांगून दोन्ही अल्पवयीन मुलांविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच दोन्ही मुलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची रवानगी डोंगरी बालसुधारगृहात केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page