मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 फेब्रुवारी 2025
मुंबई, – माटुंगा येथे राहणार्या एका पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच परिचित आरोपीने लैगिंक अत्याचार केला. याप्रकरणी मुख्य आरोपीसह त्याच्या मित्राला शाहूनगर पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर दोन्ही आरोपींना विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींपैकी एकाने पिडीत मुलीवर लैगिंक अत्याचार केला तर दुसर्याने मदत केल्याचे पोलिसांनी सांगितले.
42 वर्षांची तक्रारदार महिला ही माटुंगा परिसरात राहत असून घरकाम करते. पिडीत ही तिची पंधरा वर्षांची मुलगी आहे. याच परिसरात 20 आणि 24 वर्षांचे आरोपी राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता या दोघांनी संगनमत करुन पिडीत मुलीला एका रुममध्ये आणले. तिथेच 20 वर्षांच्या आरोपीने तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर परिणाम वाईट होईल अशी धमकी दिली होती. यावेळी 24 वर्षांच्या आरोपीने तिला घरामध्ये बंद करुन बाहेरुन टाळा लावला होता. त्याने त्याचा 20 वर्षांचा आरोपी मित्राला लैगिंक अत्याचार करण्यास प्रवृत्त करुन मदत केली होती. बदनामीच्या भीतीने पिडीत मुलीने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही.
मात्र बुधवारी तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर त्यांनी शाहूनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना ही माहिती सांगितली. या महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच काही तासांत दोघांनाही पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहे. पिडीत मुलीची सायन हॉस्पिटलमध्ये मेडीकल करण्यात आली असून आरोपीची लवकरच मेडीकल होणार आहे.
कुर्ला येथे चौदा वर्षांच्या मुलीवर अत्याचार
दुसर्या घटनेत कुर्ला येथे एका चौदा वर्षांच्या मुलीवर सोळा वर्षांच्या मुलाने लैगिंक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाविरुद्ध विनोबा भावे नगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे. ही घटना 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत कुर्ला येथील हलाव पुल ब्रिजजवळ झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पिडीत मुलगी आणि आरोपी अल्पवयीन असून नोव्हेंबर महिन्यांत त्यांची मैत्री झाली होती. मैत्रीनंतर त्याने तिच्याशी जवळीक निर्माण करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. दोन दिवसांपूर्वीच पिडीत मुलीकडून हा प्रकार तिच्या आईला समजताच तिने कुर्ला पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच त्याचा तपास विनोबा भावे नगर पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे. आरोपी अल्पवयीन मुलगा पळून गेला असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.