मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 मार्च 2025
मुंबई, – सोळा व सतरा वर्षांच्या दोन मुलींवर लैगिंक अत्याचार झाल्याचा प्रकार गोवंडी आणि अॅण्टॉप हिल परिसरात उघडकीस आले. या दोघींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यावर त्यांच्या प्रियकरांनी लैगिंक अत्याचार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे या दोन्ही प्रियकराविरुद्ध शिवाजीनगर आणि अॅण्टॉप हिल पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करुन त्यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. अटकेनंतर या दोघांनाही पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
पहिल्या गुन्ह्यांतील पिडीत तरुणी 21 वर्षांची असून ती मुलुंड येथे राहते. फैजान हा तिचा मित्र असून त्याचे तिच्यासोबत प्रेमसंबंध होते. 17 वर्षांची असताना त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात लैगिंक अत्याचार केला होता. तिच्याशी बोगस लग्न करुन तिला धर्म परिवर्तन करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला होता. तिचे तिच्या नकळत अश्लील फोटो काढून ते फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करणयाची धमकी दिली होती. तिच्या आई-वडिलांकडून पैसे उकाळून तिला बेदम मारहाण केली होती. सहा वर्षांनी तिने फैजानविरुद्ध पार्कसाईट पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर शिवाजीनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच फैजान याला पोलिसांनी अटक केली.
दुसरी घटना अॅण्टॉप हिल परिसरात घडली. पिडीत मुलगी सोळा वर्षांची असून मूळची मध्यप्रदेशातील रहिवाशी आहे. 1 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2025 शिवकुमार नावाच्या एका तरुणाने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या भांगामध्ये कुंकू भरुन तिच्याशी लग्न केल्याचे भासविले. त्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. शारीरिक संबंधासाठी शिवकुमारने तिच्यावर खोटे लग्न करुन तिची फसवणुक केल्याचे उघडकीस येताच तिने अॅण्टॉप हिल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अॅण्टॉप हिल पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.