कॅरम खेळण्याचा बहाणा करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार
अंधेरीतील घटना; सतरा वर्षांच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 मार्च 2025
मुंबई, – कॅरम खेळण्याचा बहाणा करुन घरी आणलेल्या एका सोळा वर्षाच्या मुलीवर सतरा वर्षांच्या मुलाने लैगिंक अत्याचार केल्याची घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी मुलाविरुद्घ लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. पिडीत मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.
सोळा वर्षांची पिडीत मुलगी अंधैरी परिसरात राहत असून सध्या ती शिक्षण घेते. याच परिसरात सतरा वर्षांचा आरोपी राहत असून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. जानेवारी महिन्यांत त्याने पिडीत मुलीला त्याच्या घरी कॅरम खेळण्यासाठी बोलाविले होते. त्यामुळे ती त्याच्या घरी गेली होती. यावेळी घरात कोणीही नसल्याची संधी साधून त्याने तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. त्यातून ही मुलगी गरोदर राहिली होती. हा प्रकार तिच्या पालकांच्या लक्षात येताच त्यांनी तिच्याकडे विचारणा केली होती. यावेळी तिने घडलेला प्रकार सांगितला होता. त्यानंतर त्यांनी तिच्यासोबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिने आरोपी मुलाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या आरोपी मुलाच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
गोवंडीत पित्याकडून मुलीवर लैगिंक अत्याचार
गोवंडीत 36 वर्षांच्या पित्यानेच त्याच्या तेरा वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी पित्याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तेरा वर्षांची पिडीत मुलगी गोवंडी परिसरात राहत असून ती सध्या शिक्षण घेते. आरोपी तिचे पिता असून त्याचा एसी रिपेरिंगचा व्यवसाय आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यांत घरात कोणीही नसताना त्याने पिडीत मुलीवर लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नये म्हणून तो तिला सतत जिवे मारण्याची धमकी दिली होती. बदनामीसह जिवाच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. त्याचाच फायदा घेऊन त्याने तिच्यावर 1 जुलै 2024 ते 14 मार्च 2025 या कालावधीत अनेकदा लैगिंक अत्याचार केलाद होता. त्यात ती आठ महिन्यांची गरोदर राहिली होती. ही माहिती प्राप्त होताच शिवाजीनगर पोलिसांनी मुलीची चौकशी केली होती. या चौकशीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिच्या पित्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.