मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
31 मार्च 2025
मुंबई, – मुंबई शहरात गेल्या काही वर्षांत स्वतच्याच घरात अल्पवयीन मुली सुरक्षित नसल्याचे काही घटनांवरुन उघडकीस आले आहे. अलीकडेच जोगेश्वरी व मुलुंड परिसरात जन्मदात्या पित्यानेच स्वतच्या अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. याप्रकरणी ओशिवरा आणि मुलुंड पोलिसांनी दोन स्वतंत्र लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हे दाखल करुन दोन्ही आरोपी पित्याला अटक केली आहे.
पहिल्या गुन्ह्यांतील पिडीत मुलगी सोळा वर्षांची असून आरोपी तिचे वडिल आहेत. ते शिलाईकाम करत असून त्यातून त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यांत घरात कोणीही नसताना तिच्या पित्याने तिच्याशी जवळीक निर्माण करुन अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला होता. तिची इच्छा नसताना त्याने तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नये म्हणून त्याने तिला धमकीही दिली होती. जिवासह बदनामीच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. त्याचाच गैरफायदा घेऊन त्याने सप्टेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत तिच्यावर लैगिंक अत्याचार केा होता. त्यातून ती गरोदर राहिली होती. याबाबत चौकशी केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर तिच्या तक्रारीवरुन मुलुंड पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
या घटनेपूर्वी ओशिवरा पोलिसांनी 50 वर्षांच्या आरोपीस अटक केली. त्याच्यावर त्याचाच बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप आहे. 33 वर्षांची तक्रारदार महिला ही जोगेश्वरी येथे राहत असून ती इव्हेंटचे काम करते. कामानिमित्त ती नेहमी बाहेर असते. बारा वर्षांची पिडीत तिची मुलगी आहे. 22 मार्चला ही महिला इव्हेंट कामानिमित्त बाहेर असताना तिच्याच पतीने तिच्या मुलीला मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवून अश्लील चाळे करुन सेक्स टॉयने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार मुलीकडून तिच्या आईला समजातच तिने ओशिवरा पोलिसांत आरोपी पतीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. या दोन्ही घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती. गेल्या काही महिन्यांत अशाच प्रकारच्या घटनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कधी भाऊ, कधी पिता तर कधी परिचित नातेवाईकांकडून अल्पवयीन मुलींवर होणार्या लैगिंक अत्याचाराच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. या मुली आता त्यांच्याच घरात सुरक्षित नसल्याचे दिसून गेल्या काही गुन्ह्यांतून उघडकीस आले आहे.