चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर दोन मित्रांकडून अत्याचार

लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या गुन्ह्यांत दोन्ही मित्रांना अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
18 जून 2025
मुंबई, – चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच दोन मित्रांनी लैगिंक अत्याचार केल्याचा प्रकार मालाडच्या मालवणी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपी मित्रांना मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. यातील एका आरोपीने पिडीत मुलीवर लैगिंक अत्याचार करताना मोबाईलवर तिचे न्यूड व्हिडीओ बनविले होते, तो व्हिडीओ दुसर्‍या मित्राला दिल्यानंतर त्याने तिला ब्लॅकमेल करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याचे तपासात उघडकीस आले. अटकेनंतर दोन्ही आरोपींना विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

चौदा वर्षांची पिडीत मुलगी मालाडच्या मालवणी परिसरात राहते. विकास आणि पियुष हे दोघेही तिचे चांगले मित्र असून ते दोघेही मालवणी परिसरात राहतात. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यांत ही मुलगी तिच्या एका मैत्रिणीच्या घरी गेली होती. यावेळी तिच्यासोबत विकास हादेखील होता. मैत्रिणीच्या घरी कोणी नसल्याची संधी साधून त्याने तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. त्यांच्यातील शारीरिक संबंधाचे न्यूड व्हिडीओ त्याच्या मोबाईलवर काढले होते. हा व्हिडीओ त्याने त्याचा मित्र पियुषसह तिच्या मैत्रिणीला पाठविले होते. हा व्हिडीओ दाखवून पियुष हा तिला ब्लॅकमेल करत होता.

एप्रिल 2024 रोजी त्याने तिला मनोरी येथील एका लॉजमध्ये आणले आणि तिथे तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. त्याच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले नाहीतर तिचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीच त्याने तिला दिली होती. हा व्हिडीओ पियुषने त्याच्या मोबाईलमध्ये सेव्ह करुन ठेवला होता. 6 जूनला तो व्हिडीओ पिडीत मुलीसह तिच्या आईने पाहिला होता. त्यानंतर तिच्या आईने तिला विचारणा केली होती. यावेळी तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर त्यांनी मालवणी पोलीस ठाण्यात धाव घेऊन दोन्ही आरोपी मित्रांविरुद्ध तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर विकास आणि पियुष या दोघांविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच मंगळवारी 17 जूनला दोन्ही आरोपी मित्रांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. मंगळवारी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.

सायन येथे तरुणीवर मित्रांकडून लैगिंक अत्याचार
मालवणीतील घटना ताजी असताना सायन येथे एका 25 वर्षांच्या तरुणीवर तिच्याच दोन मित्रांनी लैगिंक अत्याचार केला. पिडीत तरुणी अल्पवयीन असताना दोघांनी तिच्यावर अत्याचार केल्याचे तपासात उघडकीस आले. तिच्या तक्रारीवरुन युवराज आणि राजीव या दोन्ही आरोपीविरुद्ध सायन पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. चौकशीनंतर या दोघांनाही नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे.

पिडीत तरुणी सध्या न्यूयॉर्कच्या एका नामांकित कंपनीत प्रोडक्ट मॅनेजर म्हणून कामाला असून सध्या ती विलेपार्ले परिसरात राहते. पंधरा वर्षांची असताना युवराजने इमोशनल ब्लॅकमेल करुन, शिवीगाळ आणि मारहाण करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. त्यानंतर ती सतरा वर्षांची असताना राजीवने तिला प्रपोज करुन तिच्याशी बोगस प्रेमसंबंध निर्माण करुन तिच्यावर सतत लैगिंक अत्याचार केला होता. जानेवारी 2015 ते जानेवारी 2024 या कालावधीत या दोघांनी तिच्यावर अनेकदा जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. सुरुवातीला तिने बदनामीच्या भीतीने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. अखेर मंगळवारी तिने युवराज आणि राजीव या दोघांविरुद्ध सायन पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोन्ही आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर या दोघांनाही 35 (3) ची नोटीस देऊन सोडून देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page