दोन घटनेत दोन अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार

प्रेयसीसह प्रियकराला अटक तर नातेवाईकाचा शोध सुरु

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 जून 2025
मुंबई, – जोगेश्वरी येथे एका दहा वर्षांच्या मुलीवर तिच्याच घरी राहणार्‍या एका तरुणाने लैगिंक अत्याचार केला तर त्याला त्याच्याच प्रेयसीने मदत केल्याचे तसेच माटुंगा येथे एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच नातेवाईकाने तब्बल बारा वर्ष लैगिंक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मेघवाडी आणि शाहूनगर पोलिसांनी दोन स्वतंत्र लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत एका आरोपीला त्याच्या प्रेयसीसोबत मेघवाडी पोलिसांनी अटक केली तर आरोपी नातेवाईकाचा शाहूनगर पोलिसांकडून शोध सुरु आहे.

36 वर्षांची तक्रारदार महिला ही जोगेश्वरी परिसरात राहत असून एका कॅटरिंग कंपनीत वेटर म्हणून काम करते. दहा वर्षांच पिडीत तिची मुलगी आहे. आरोपी अनुराग आणि पौर्णिमा हे दोघेही तक्रारदार महिलेसोबत काम करत असून तिच्याच घरी राहत होते. अनेकदा ती कामावर असताना ते दोघेही घरी राहत होते. याच दरम्यान अनुरागने पिडीत मुलीशी जवळीक निर्माण करुन तिच्यावर तीन ते चार वेळा लैगिंक अत्याचार केला होता. इतकेच नव्हे तर स्क्रु ड्रायव्हरने तिचा मानसिक शोषण केले होते. त्यामुळे तिच्या गुप्त भागावर जखम झाली होती. हा संपूर्ण प्रकार पौर्णिमाने तिच्या मोबाईलवर शूट केला होता. 15 मे ते 14 जून 2025 या कालावधीत हा प्रकार घडला होता. पिडीत मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना अनुरागकडून तिच्यावर अत्याचार सुरु होता तर पौर्णिमा त्याला मदत करत होती.

तिने हा प्रकार कोणालाही सांगू नये म्हणून या दोघांनी तिच्या तक्रारदार आईला जिवे मारण्याची तसेच तिचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. जिवाच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. दोन दिवसांपूर्वी हा प्रकार तिच्या आईला निदर्शनास आला होता. त्यामुळे तिने तिच्याकडे विचारपूस केली होती. यावेळी तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला होता. त्यांनतर तिने मेघवाडी पोलिसांत दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच अनुराग आणि पौर्णिमा या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अनुरागची पौर्णिमा ही प्रेयसी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दुसर्‍या घटनेत एका तरुणीवर तिचाच नातेवाईक गेल्या बारा वर्षांपासून लैगिंक अत्याचार करत असल्याचा प्रकार माटुंगा परिसरात उघडकीस आला आहे. पिडीत तरुणी 25 वर्षांची असून बारा वर्षापूर्वी ती तेरा वर्षांची होती. त्यावेळेस ती आरोपी नातेवाईकाच्या माटुंगा येथील घरी राहत होती. तेव्हापासून आरोपी तिच्यासोबत अश्लील चाळे करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार करत होता. हा प्रकार कोणाला सांगितल्यास तिला घराबाहेर काढण्याची धमकी देत होता. जानेवारी 2013 ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीत हा प्रकार घडला होता. सुरुवातीला बदनामीच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. दोन दिवसांपूर्वी तिने घडलेला प्रकार शाहूनगर पोलिसांना आरोपी नातेवाईकाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह लैगिंक अत्याचार आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page