चौदा आणि सोळा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

दोन्ही मुली गरोदर राहिल्यानंतर उघडकीस आला प्रकार

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
22 जून 2025
मुंबई, – चौदा आणि सोळा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर त्यांच्याच प्रियकरासह मित्राने लैगिंक अत्याचार केल्याची घटना माहीम आणि जी. टी हॉस्पिटलजवळ घडली. याप्रकरणी माहीम आणि आझाद मैदान पोलिसांनी दोन स्वतंत्र लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हे दाखल केले होते. याच गुन्ह्यांत आरोपी प्रियकरासह मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची रवानगी डोंगरीतील बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

38 वर्षांची तक्रारदार महिला ही ताडदेव परिसरात राहत असून चौदा वर्षांची पिडीत तिची मुलगी आहे. सोळा वर्षांचा आरोपी हा तिच्या मुलीचा मित्र असून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. 15 फेब्रुवारीला त्याने तिला त्याच्या जी. टी हॉस्पिटलजवळील घरी आणले होते. तिथेच त्याने तिच्याशी जवळीक साधून, घरी कोणी नसल्याची संधी साधून तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. त्यातून ती गरोदर राहिली होती. हा प्रकार नंतर तिच्या आईच्या लक्षात येताच तिने आझाद मैदान पोलिसांत आरोपी मुलाविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच सोळा वर्षांच्या आरोपी मित्राला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

दुसरी घटना माहीम परिसरात घडली. या गुन्ह्यांतील पिडीत मुलगी सोळा वर्षांची असून ती सायन येथे तिच्या पालकांसोबत राहते. आरोपीदेखील सतरा वर्षांचा असून तो बोरिवली येथे राहतो. फेब्रुवारी महिन्यांत या दोघांची मैत्री आणि मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले होते. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले होते. त्यानतर ते दोघेही भेटत होते. फेब्रुवारी ते मार्च 2025 या काावधीत ते दोघेही अनेकदा माहीम दर्ग्यामागील समुद्रकिनार्‍यावर भेटले होते. तिथेच त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. त्यातून ती गरोदर राहिली होती. हा प्रकार नंतर तिच्या पालकांना समजला होता. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता.

शनिवारी या मुलीच्या तक्रारीवरुन तिचा अल्पवयीन प्रियकराविरुद्ध माहीम पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच दोन्ही गुन्ह्यांतील आरोपींना माहीम अणि आझाद मैदान पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.त्यानंतर या दोघांनाही पुढील कारवाईसाठी डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page