लैगिंक अत्याचाराच्या गुन्हयांत योगा शिक्षकासह दोघांना अटक
चौदा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 जानेवारी 2026
मुंबई, – लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या दोन स्वतंत्र गुन्ह्यांत एका 36 वर्षांच्या योगा शिक्षकासह दोघांना काळाचौकी आणि गोरेगाव पोलिसांनी अटक केली. या दोघांवर चौदा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप असून याच गुन्ह्यांत दोन्ही आरोपींना विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील शिक्षकाने योगा शिकवणीदरम्यान पिडीत मुलीचा विनयभंग करुन तिच्या लैगिंक अत्याचार केला तर दुसर्या घटनेत पिडीत मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
व्यवसायाने कारपेंटर असलेले तक्रारदार त्यांच्या कुटुंबियांसोबत काळाचौकी परिसरात राहतात. त्यांची पिडीत चौदा वर्षांची मुलगी असून ती सध्या शिक्षण घेते. याच परिसरात 36 वर्षांचा आरोपी योगाचे क्लास घेतो. याच क्लासमध्ये पिडीत मुलगी जात होती. 26 डिसेंबरला ती नेहमीप्रमाणे योगा शिकवणीसाठी आरोपीकडे गेली होती. दुपारी तीन वाजता आरोपीने तिच्याशी जवळीक साधून तिच्याशी अश्लील वर्तन करुन विनयभंग केला होता. तसेच तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस अशी धमकी देऊन त्याने तिची सुटका केली होती.
भीतीपोटी तिने हा प्रकार कोणालाही सांगितला. मात्र चार दिवसांनी तिने तिच्या वडिलांना हा प्रकार सांगितला. या घटनेनंतर ते दोघेही काळाचौकी पोलीस ठाण्यात गेले होते. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्यांनी योगा शिक्षकाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध विनयभंगासह लैगिंक अत्याचार तसेच पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला बुधवारी 30 डिसेंबरला पोलिसांनी अटक केली.
ही घटना ताजी असताना गोरेगाव येथे अन्य एका चौदा वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे. पिडीत मुलगी ही गोरेगाव येथे राहत असून सध्या ती शिक्षण घेते. अठरा वर्षांचा आरोपी तिच्या परिचित असून त्याने मे ते सप्टेंबर 2025 या कालावधीत तिच्यावर अनेकदा जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. त्यातून ती गरोदर राहिली होती. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता.
या घटनेनंतर पिडीत मुलीच्या तक्रारीवरुन गोरेगाव पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला बुधवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोन्ही आरोपींना विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.