वेगवेगळ्या घटनेत दोन अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार

दोन्ही आरोपींना अटक तर एका आरोपीचा शोध सुरु

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 मार्च 2026
मुंबई, – शहरात वेगवेगळ्या घटनेत तेरा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार झाल्याचा प्रकार कांदिवली आणि चेंबूर परिसरात उघडकीस आला आहे. त्यापैकी एका घटनेत जन्मदात्या पित्यानेच त्याच्या तेरा वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार केला आहे. याप्रकरणी टिळकनगर आणि कांदिवली पोलीस ठाण्यात लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या दोन गुन्ह्यांची नोंद होताच दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर या दोघांनाही विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत एकाला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. बुधवारी उघडकीस आलेल्या या दोन्ही घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

यातील पहिल्या गुन्ह्यांतील तक्रारदार महिला पवईतील आरे कॉलनी परिसरात राहत असून तेरा वर्षांची पिडीत तिची मुलगी आहे. रविवारी 1 मार्चला रात्री आठ वाजता चेंबूर परिसरात तिच्याच परिचित 29 वर्षांच्या आरोपीने पिडीत मुलीवर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. यावेळी घराबाहेर त्याच्या मित्राने पहारा ठेवता बाहेरुन कडी लावली होती. जेणेकरुन ही मुलगी बाहेर येऊ नये. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस अशी धमकी देऊन या दोघांनी तिची सुटका केली. घरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या तक्रारदार आईला सांगितला. ही माहिती ऐकून तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिने टिळकनगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच लैगिंक अत्याचार करणार्‍या आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली तर पहारा देणारा त्याचा मित्र पळून गेला. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

दुसरी घटना कांदिवली परिसरात घडली. याच परिसरात राहणार्‍या तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच पित्याने लैगिंक अत्याचार केला. गेल्या पाच वर्षांपासून आरोपी पिता पिडीत मुलीवर लैगिंक अत्याचार करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी पित्याला पोलिसांनी अटक केली. तेरा वर्षांची ही मुलगी तिच्या कुटुंबियांसोबत कांदिवली परिसरात राहते. 40 वर्षांचा आरोपी तिचा पती आहे. 30 सप्टेंबर 2025 ते 2 मार्च 2026 या कालावधीत घरात कोणीही नसताना तिचे वडिल तिच्याशी जवळीक साधून अश्लील चाळे करत होते. तिच्या छातीसह इतर ठिकाणी नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग करत होते. तिच्याशी लैगिंक अत्याचार करत होते. गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार नियमित घडत असल्याने पिडीत मुलगी वडिलांच्या मानसिक व शारीरिक शोषणाला कंटाळून गेली होती.

दोन दिवसांपूर्वी तिने तिच्या पित्याविरुद्ध समतानगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत तिच्या तक्रारीवरुन आरोपी पित्याविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच रात्री उशिरा आरोपी पित्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर दोन्ही आरोपींना विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page