सोळा व सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलींवर लैगिंक अत्याचार
माझगाव-गोरेगाव येथील घटना; दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२६ ऑगस्ट २०२४
मुंबई, – सोळा आणि सतरा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार झाल्याची घटना माझगाव आणि गोरेगाव परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरे आणि भायखळा पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद केली आहे. यातील एका गुन्ह्यांतील २३ वर्षांच्या आरोपीस आरे पोलिसांनी अटक केली तर दुसर्या गुन्ह्यांत सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलाला डोंगरी सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
पहिल्या गुन्ह्यांतील पिडीत मुलगी सतरा वर्षांची असून ती प्रभादोवी येथे राहते. काही महिन्यांपूर्वी तिची सोशल मिडीयावर एका सतरा वर्षांच्या मुलासोबत ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही मित्र झाले होते. मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले होते. फेब्रुवारी २०२४ रोजी ती त्याला भेटण्यासाठी माझगाव येथे गेली होती. यावेळी त्याने तिच्याशी जवळीक साधून अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. त्यानंतर त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तिने त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात तिला यश आले नाही. या प्रकारानंतर ती प्रचंड घाबरली होती. बदनामीसह भीतीपोटी तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. अलीकडेच तिने घडलेला प्रकार तिच्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर त्यांच्या सल्ल्यानंतर तिने भायखळा पोलिसात अल्पवयीन मित्राविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध ३५४, ३७६, ५०४, ५११ भादवी सहकलम ८ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तो अल्पवयीन असल्याने त्याला नंतर बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते.
दुसर्या गुन्ह्यांत एका सोळा वर्षांच्या मुलीवर तिच्याच परिचित आरोपी लैगिंक अत्याचार केला. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच राजेशकुमार या २३ वर्षांच्या आरोपीस अटक केली. पिडीत मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात शेजारी राहतात. या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. फेब्रुवारी ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत त्याने तिच्यावर गोरेगाव येथील आरे कॉलनीतील एका तबेल्यामध्ये चार ते पाच वेळा जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. त्यातून ही मुलगी गरोदर राहिली होती. हा प्रकार अलीकडेच तिच्या आईच्या लक्षात आला होता. जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये मेडीकल केल्यानंतर डॉक्टरांनी ती चार महिन्यांची गरोदर असल्याचे सांगितले. त्यानंतर तिच्या आईने राजेशकुमारविरुद्ध आरे पोलिसात तक्रार केली होती. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच रविवारी रात्री उशिरा त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला सोमवारी दुपारी दिडोंशीतील पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.