सात वर्षांच्या मुलीवरील अत्याचारप्रकरणी नातेवाईकास अटक

दहा रुपये देतो असे सांगून जवळीक साधून लैगिंक अत्याचार

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – खाऊसाठी दहा रुपये देतो असे सांगून सात वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच २४ वर्षांच्या नातेवाईकाने त्याच्या राहत्या घरी लैगिंक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार गोवंडी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह जिवे मारण्याची धमकी देणे तसेच पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी नातेवाईकाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

३२ वर्षांची तक्रारदार महिला ही गोवंडीतील बैंगणवाडीत राहते. पिडीत सात वर्षांची तिची मुलगी तर २४ वर्षांचा आरोपी तिच्या नणंदेचा पती आहे. रविवारी २९ सप्टेंबरला दुपारी तीन वाजता त्याने या मुलीला खाऊ खाण्यासाठी दहा रुपये देतो असे सांगून बोलावून त्याच्या घरी आणले. त्यानंतर त्याने तिच्याशी जवळीक साधून तिच्याशी अश्‍लील चाळे करुन तिच्यावर लैगिंक छळ केला. तिच्या शरीरासह गुप्त भागावर लैगिंक अत्याचार करुन तिला हा प्रकार कोणालाही सांगू नकोस नाहीतर जिवे मारण्याची धमकी दिली होती. सोमवारी हा प्रकार तिने तिच्या आईला सांगितला. या माहितीनंतर तिने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिच्या नणंदेच्या पतीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह जिवे मारण्याची धमकी देणे तसेच पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत आरोपीला त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
लग्नाच्या आमिषाने सतरा वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार
दुसर्‍या गुन्ह्यांतील पिडीत मुलगी सतरा वर्षांची असून ती शिवडी परिसरात राहते. १९ वर्षांचा हुसैन हा तिचा मित्र असून तोदेखील याच परिसरात राहतो. काही महिन्यांपूर्वी त्याने तिला लग्नाची मागणी घातली होती. तिला तो आवडत होता, त्यामुळे तिनेही त्यास होकार दिला होता. १३ मेला त्याने तिला शिवडीतील यु टँक बंदर रोड परिसरात बोलाविले होते. तिथे त्याने तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. त्यातून ती गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. जे. जे हॉस्पिटलमध्ये मेडीकल केल्यानंतर ती पाच महिन्यांची गरोदर असल्याचा रिपोर्ट आला होता. ही माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून शिवडी पोलिसांना देण्यात आली होती. त्यानंतर शिवडी पोलिसांनी पिडीत मुलीची जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीनंतर पोलिसांनी हुसैनविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page