युएस डॉलर खरेदीच्या नावाने व्यावसायिकाची २१ लाखांची फसवणुक
सिनेसृष्टीतील बोगस दिग्दर्शकासह सहकार्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – युएस डॉलर खरेदीच्या नावाने एका व्यावसायिकाची सुमारे २१ लाख रुपयांची फसवणुक झाल्याचा प्रकार सांताक्रुज परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सिनेसृष्टीशी संबंधित बोगस दिग्दर्शकासह त्याच्या सहकार्याविरुद्ध वाकोला पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. पळून गेलेल्या या दोघांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी शोध घेत आहेत. अशा प्रकारे फसवणुक करणारी ही टोळी असून या टोळीने अनेकांची फसवणुक केल्याचे बोलले जाते.
परेश भॅवरलाल परमार यांचा फॉरेक्सचा व्यवसाय असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत विलेपार्ले येथे राहतात. त्यांची परेश फॉरेक्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी असून या कंपनीत ते त्यांच्या पत्नीसह संचालक म्हणून काम करतात. ही कंपनी विदेशी चलन एक्सचेंजचा व्यवसाय करते. २६ फेब्रुवारीला त्यांच्या विक्रम सिंग या मित्राने त्यांना फोन करुन त्याचा एक मित्र असून त्याचा दिल्लीत टुर्स ऍण्ड ट्रॅव्हेल्सचा व्यवसाय आहे. त्याला काही विदेशी चलनाची गरज आहे असे सांगितले. काही वेळानंतर त्यांना गौरव गोस्वामी या व्यक्तीने फोन करुन त्याला त्यांचा मोबाईल क्रमांक विक्रम सिंग याने दिल्याचे सांगितले. त्याच्या एका मित्राला विदेशात जाण्यासाठी २५ हजारर युएस डॉलरची गरज आहे. त्यामुळे त्याला मदत करण्याची विनंती केली होती. त्यानंतर ते त्यांच्या पत्नीसोबत त्याच्या मित्राला भेटण्यासाठी सांताक्रुज येथील हयात हॉटेलमध्ये गेले होते. तिथे गेल्यानंतर त्याला कृष्णन नावाचा एक तरुण भेटला. त्यालाच युएस डॉलरची गरज असल्याचे सांगून त्याने त्यांना एका रुममध्ये आणले होते. रुममध्ये गेल्यानतर तिथे अन्य दोन तरुण होते. यावेळी कृष्णनने बॉलीवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून काम करतो. पूर्वी त्याचा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय होता.
याच हॉटेलच्या लॉबीमध्ये अक्षयकुमारचे शूटींग सुरु आहे. अक्षयकुमारला भेटायचे असल्याने त्याने त्यांना तिथे येण्याची विनंती केली होती. त्याला विदेशी चलनाची गरज भासत असल्याने त्यातून त्यांना चांगला फायदा होईल असे सांगून त्याने त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्याने त्यांच्याकडून २५ हजार युएस डॉलर घेतले. त्यांचा सहाय्यक आवश्यक कागदपत्रे घेऊन येईल आणि नंतर त्यांना पेमेंट करतो असे सांगून तो रुमबाहेर निघून गेला. मात्र बराच वेळ वाट पाहूनही कृष्णनन तिथे आला होता. त्यामुळे त्यांनी गौरव गोस्वामीला फोन करुन कृष्णननविषयी विचारणा केली होती. त्यालाही कृष्णननविषयी काहीच नव्हती.
हा प्रकार त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगून त्याचा हॉटेलमध्ये शोध घेतला. मात्र तो कुठेच सापडला नाही. सिनेदिग्दर्शक क्षेत्रात कार्यरत असल्याची बतावणी करुन, बोलण्यात गुंतवून कृष्णन हा २१ लाख २५ हजार रुपयांचे युएस डॉलर घेऊन पळून गेला होता. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी वाकोला पोलिसांना ही माहिती दिली. त्यांच्या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा वाकोला पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत. ं