स्वस्तात युएसडीटी देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची फसवणुक

अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच तिघांना अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
6 एप्रिल 2026
मुंबई, – स्वस्तात युएसडीटी देण्याच्या आमिषाने एका व्यावसायिकाची सहाजणांच्या टोळीने सुमारे 18 लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या तीन आरोपींना कुरार पोलिसांनी अटक केली आहे. विश्वनाथ ऊर्फ विष्णू निलाकंदन शेट्टीयार, तुषार माधव उमाप आणि राकेश एकनाथ सावंत अशी या तिघांची नावे असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत ते तिघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांच्या इतर सहकार्‍यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

सेंथीलकुमार मोहानन हे मूळचे तामिळनाडू येथील कांजीपुरमचे रहिवाशी असून सध्या ते त्यांच्या कुटुंबियांसोबत अंधेरीतील एसव्हीपी नगर, तपस्या अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांचा कमोडिटी ट्रेडिंगचा व्यवसाय असून ते शेअरमार्केटमध्ये अधूनमधून गुंतवणुक करतात. त्यातून त्यांची ओळख तुषार उमापशी झाली होती. जानेवारी महिन्यांत त्यांची अंधेरीतील इन्फिनिटी मॉलजवळ भैट झाली होती. यावेळी त्यांच्यात स्टॉक मार्केट,, कमोडिटी ट्रेडिंग आणि युएसडीटीबाबत चर्चा झाली होती. त्याने त्यांना स्वस्तात युएसडीटी देण्याचे आश्वासन दिले होते. काही दिवसांनी त्याने त्यांची त्याच्या इतर आरोपी सहकार्‍यांशी ओळख करुन दिली होती.

या चर्चेत त्यांच्यात 25 लाखांचे युएसडीटी खरेदीबाबत सविस्तर चर्चा झाली होती. चर्चेनंतर त्यांनी 26 हजार युएसडीटी खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे 28 मार्चला ते सर्वजण गोरेगाव येथील फिल्मसिटी रोड, क्लासिक हॉटेलमध्ये भेटले होते. यावेळी विश्वनाथने त्याच्याकडे एक लाख तीन हजार युएसडीटी असल्याचे सांगितले. मात्र त्यांनी त्याला 26 हजार युएसडीटी खरेदी करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी त्याने त्यांना 17 लाख 93 हजार 600 रुपयांचा एक धनादेश दिला होता.

ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती. मात्र पेमेंट करुनही त्यांनी त्यांना युएसडीटी दिले नाही. विचचारणा केल्यानंतर ते सर्वजण विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. या सर्वांना स्वस्तात युएसडीटी देतो असे सांगून त्यांच्याकडून घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी कुरार पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती.या तक्रारीनंतर आरोपींविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती.

ही शोधमोहीम ुसरु असातना विश्वनाथ शेट्टीयार, तुषार उमाप आणि राकेश सावंत या तिघांना पोलिसांनी अटक केली. पोलीस कोठडीनंतर या तिघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page