सांताक्रुजच्या हॉटेलमध्ये 24 वर्षांच्या तरुणीची आत्महत्या
प्रियकराला भेटण्यासाठी मध्यप्रदेशातून मुंबईत आली होती
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 फेब्रुवारी 2025
मुंबई, – सांताक्रुज येथील एका हॉटेलमध्ये ईशानीकुमारी नावाच्या एका 24 वर्षांच्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तिच्याकडे पोलिसांना सुसायट नोट सापडली नाही. त्यामुळे तिच्या आत्महत्येमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही. दरम्यान ईशानीकुमारी ही तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी मुंबईत आली होती. त्याला भेटल्यानंतर तिने आत्महत्या केली होती, त्यामुळे या प्रियकरासह तिच्या कुटुंबियांची वाकोला पोलिसांकडून चौकशी होणार आहे. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे.
ईशानीकुमारी ही मूळची बिहारची रहिवाशी असून ती तिच्या कुटुंबियांसोबत तिथे राहत होती. सध्या ती शिक्षण घेत असून त्यासाठी ती मध्यप्रदेशातील भोपाळ येथे राहत होती. काही दिवसांपूर्वी ती मुंबईत आली होती. तेव्हापासून ती सांताकुज येथील वाकोला, लक्ष्मी पॅलेस हॉटेलमध्ये राहत होती. मंगळवारी ती तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी गेली होती. त्यानंतर ती पुन्हा हॉटेलमध्ये आली होती. मात्र चेकआऊटची वेळ होऊन ती रुमबाहेर आली नाही. त्यामुळे हॉटेलच्या कर्मचार्यांनी तिला कॉल केला होता, मात्र तिने प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे कर्मचारी तिच्या रुममध्ये गेले होते, रुमचा दरवाजा ठोठावून तिने दरवाजा उघडला नाही.
हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी वाकेला पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे धाव घेतली होती. दरवाजा तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला असता ईशानीकुमारीने रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यामुळे तिला तातडीने जवळच्या व्ही. एन देसाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित करण्यात आले होते. याच दरम्यान ईशानीकुमारीचा संपर्क होत नसल्याने तिचा भाऊ मुंबईत आला होता. तिचा शोध घेत असताना त्याला त्याच्या बहिणीने सांताक्रुज येथील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याचे समजले. त्यानंतर त्याने वाकोला पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.
हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्याने मृत तरुणी त्याचीच बहिण असल्याचे सांगितले. ईशानीकुमारीकडे पोलिसांना सुसायट नोट सापडली नाही. त्यामुळे तिने आत्महत्या का केली याचा उलघडा होऊ शकला नाही. तपासात ती तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी मुंबईत आली होती. तिची त्याच्याशी भेट झाली की नाही याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. मात्र त्यानंतरच तिने हॉटेलमध्ये आल्यानंतर आत्महत्या केली होती. त्यामुळे या प्रियकराची पोलिसाकडून चौकशी होणार आहे. तसेच तिच्या कुटुंबियांचीही पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर तिच्या आत्महत्येमागील कारणाचा उलघडा होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.