दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहीत महिलेची आत्महत्या
माहेरच्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
7 एप्रिल 2025
मुंबई, – दोन महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या एका 29 वर्षांच्या नवविवाहीत महिलेने आत्महत्या केल्याची घटना सांताक्रुज परिसरात उघडकीस आली आहे. नेहा मिश्रा असे या महिलेचे नाव असून ती तिच्या माहेरी आली होती. रविवारी रात्री तिने माहेरच्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले. तिच्याकडे सुसायट नोट सापडले नाही. त्यामुळे तिच्या आत्महत्येामगील कारणांचा खुलासा झालेला नाही. तिच्या आईसह पती आणि इतर कुटुंबियांची लवकरच पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे.
नेहा मिश्रा ही तिच्या कुटुंबियांसोबत सांताक्रुज येथील कालिना, शास्त्रीनगर परिसरात राहत होती. दोन महिन्यांपूर्वीच तिचा विवाह झाला होता. काही दिवसांपूर्वी ती तिच्या सांताक्रुज येथील माहेरी आली होती. रविावारी रात्री तिची आई मंदिरात दर्शनासाठी गेली होती. दर्शन घेऊन ती घरी आली असता तिला नेहाने छताच्या सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहून तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर स्थानिक रहिवाशांनी नेहाला जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. सर्व काही सुरळीत असताना नेहाने लग्नाच्या दोन महिन्यांत गळफास घेऊन जीवन संपविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तिच्याकडे सुसायट नोट सापडली नाही. त्यामुळे तिने आत्महत्या का केली याचा उलघडा होऊ शकला नाही.
दरम्यान या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत वाकोला पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहे. नेहा ही मानसिक तणावात होती का, तिचा सासरच्या मंडळीकडून मानसिक शोषण सुरु होता, तिला आत्महत्या करण्यास कोणी प्रवृत्त केले का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. नेहाची आईसह पती आणि इतर कुटुंबियांच्या चौकशीतून तिच्या आत्महत्येमागील कारणाचा पोलिसांकडून शोध घेत आहेत. या घटनेमागे दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान नेहाच्या आत्महत्येने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.