फ्रिलान्स ट्रेनरला ऑनलाईन गंडा घालणार्‍या ठगाला अटक

बँक खाते दिल्यानंतर ठगांकडून आरोपीला राशन भरुन दिले

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – गोरेगाव परिसरातील एका फ्रिलान्स ट्रेनरची शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणुक केल्याप्रकरणी उदय सुनथ झा या २९ वर्षांच्या ठगाला वनराई पोलिसांनी अटक केली. फसवणुकीसाठी बँक खाती पुरविल्यानंतर सायबर ठगांनी त्याला एक महिन्यांचे रेशन भरुन दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने २५ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

गोरेगाव येथे राहणारे तक्रारदार हे फ्रीलान्स ट्रेनर आहेत. गेल्या वर्षी त्याना इंस्टाग्रामवर एक विडिओ दिसला. व्हिडीओ पाहत असताना वेब पेज उघडले. तेथे मोफत शेअर मार्केट ट्रेडिंग असे नमूद होते. त्याने त्या लिंकवर क्लिक केले. क्लिक केल्यावर त्याना एका व्हाट्स अप ग्रुपवर जोडले गेले. त्या ग्रुपवर शेअर ट्रेडिंग बाबत चर्चा होत होती. त्यावर विश्वास ठेऊन त्याने एक अप्स डाऊन लोड केले. त्या अप्सद्वारे २० हजाराचे रिचार्ज करण्यास सांगितले. रिचार्ज केल्यानंतर त्याना पुन्हा २० हजार रुपया चे शेअर घेण्यास सांगितले. त्याने ते शेअर घेतल्यानंतर त्याना ५ टक्के परतावा मिळेल असे सांगितले होते.
शेअर घेतल्यानंतर त्याना आयपीओ मध्ये देखील गुंतवणूक करण्यास सांगितली. पैसे गुंतवल्यानंतर जानेवारी महिन्यात त्याना ग्रुप ऍडमिन कडून मेसेज येणे बंद झाले. तसेच त्या ग्रुप मधील सदस्य कमी होऊ लागले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने ग्रुप ऍडमिनला विचारणा केली. ग्रुप ऍडमिन ने त्याना काहीच प्रतिसाद दिला नाही. तसेच काही दिवसांनी ते अप्स उघडणे देखील बंद झाले. सात लाख रुपयाची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने सायबर हेल्प लाईनवर तक्रार केली. त्यानंतर त्याने वनराई पोलीस ठाण्यात धाव घेतली.
वरिष्ठ निरीक्षक रामप्यारे राजभर याच्या पथकातील उपनिरीक्षक रावसाहेब वाघमोडे आणि शेख आदीच्या पथकाने तपास सुरु केला. तपासा दरम्यान पोलिसांना उदयची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नवी मुंबईत सापळा रचून झाच्या मुसक्या आवळल्या. झाच्या परिचित असणाऱ्या एकाने त्याला त्याचे चित्रनगरीत काम केल्याचे पैसे खात्यात येणार असल्याचे सांगून तपशील घेतला होता. त्यानंतर ते खाते ठगाना वापरण्यास दिले होते. त्या खात्यात फसवणुकीच्या एकूण रक्कमेपैकी काही रक्कम जमा झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page