अल्पवयीन मुलीचा वयोवृद्धाकडून विनयभंग
६७ वर्षांच्या वयोवृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ जानेवारी २०२४
मुंबई, – साडेचार वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा एका ६७ वर्षांच्या वयोवृद्धाने अश्लील चाळे विनयभंग केल्याची घटना अंधेरी परिसरात घडली. याप्रकरणी ६७ वर्षांच्या वयोवृद्धाविरुद्ध वर्सोवा पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत त्याला ताब्यात घेतल्यानंतर ३५ (३) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत नोटीस देऊन सोडून देण्यात आले.
३९ वर्षांची तक्रारदार महिला अंधेरीतील वर्सोवा परिसरात राहत असून साडेचार वर्षांची बळीत तिची मुलगी आहे. शुक्रवारी रात्री सव्वादहा वाजता ही मुलगी सोसायटीच्या आवारात होती. यावेळी तिथे वयोवृद्ध आरोपी आला आणि त्याने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. दुसर्या दिवशी हा प्रकार मुलीकडून समजताच तिने आरोपी वयोवृद्धाविरुद्ध वर्सोवा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले.