मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – अंधेरीतील वर्सोवा समुद्रकिनार्यावर फिरायला घेऊन आलेल्या स्वतच्या पाच वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच पित्याने अश्लील चाळे करुन लैगिंक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका २५ वर्षांच्या ऍक्टरच्या सतर्कमुळे हा प्रकार उघडकीस आला आणि त्याने कंट्रोल रुमला ही माहिती दिली. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपी पित्याला अटक केली आहे. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी हा मूळचा बिहारचा रहिवाशी असून सध्या अंधेरीतील वर्सोवा परिसरात राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तक्रारदार २५ वर्षांचा तरुण मूळचा मध्यप्रदेशच्या संढोन, जयसिंगनगरचा रहिवाशी आहे. सध्या तो मालाडच्या मढ परिसरात राहतो. त्याला बॉलीवूडमध्ये करिअर करायचे होते. त्यासाठी तो मुंबईत आला होता. बॉलीवूडमध्ये काम मिळावे यासाठी त्याचे प्रयत्न सुरु होते. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता तो अंधेरीतील वर्सोवा गंगाभवन सोसायटीमागील समुद्रकिनार्यावर फिरत होता. यावेळी त्याला एक व्यक्ती लहान मुलीसोबत समुद्रकिनार्याजवळल दगडाच्या आतमध्ये अश्लील वर्तन करत असल्याचे दिसून आले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याने त्याला मुलीसोबत काय करतोस याबाबत जाब विचारला होता. मात्र त्याने काहीच उत्तर दिले नाही. त्यामुळे त्याने मुलीकडे विचारणा केली असता तिने आरोपी तिचे वडिल आहे. ते तिच्या पार्श्व भागावर अश्लील चाळे करत होते. या घटनेनंतर त्याने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला ही माहिती दिली. ही माहिती मिळताच वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी आरोपीसह बळीत मुलीला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.
याप्रकरणी ऍक्टर तरुणाच्या जबानीवरुन पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध ६४, ६५ भारतीय न्याय सहिता सहकलम ४, ६, ८, १०, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात २८ वर्षांचा आरोपी ाह मूळचा बिहारच्या मोतीहारी पिंगराकोठीचा रहिवाशी आहे. सध्या तो त्याच्या कुटुंबियांसोबत अंधेरीतील वर्सोवा परिसरात राहतो. शनिवारी तो त्याच्या बळीत पाच वर्षांच्या मुलीला घेऊन समुद्रकिनार्यावर फिरायला घेऊन आला होता. यावेळी त्याने तिला समुद्रकिनार्याजवळ दगडाच्या आत नेले आणि तिथेच तिच्याशी अश्लील चाळे करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता.