शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन मॉडेलवर लैगिंक अत्याचार

अश्‍लील व्हिडीओ काढून ब्लॅकमेल करणार्‍या आरोपीस अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – कामानिमित्त घरी बोलावून शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन एका ३० वर्षांच्या मॉडेलवर तिच्याच परिचित व्यक्तीने लैगिंक अत्याचार केला. शारीरिक संबंधासाठी अश्‍लील व्हिडीओ बनवून तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच गुणवंत ताराचंद जैन ऊर्फ निकेश मधानी या आरोपीस वर्सोवा पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

पिडीत ३० वर्षांची महिला ही तिच्या कुटुंबियांसोबत मालाड परिसरात राहते. ती मॉडेल असून तिला मॉडलिंग क्षेत्रात करिअर करायचे होते. त्यामुळे ती या क्षेत्राशी संबंधित काही लोकांच्या संपर्कात होती. मार्च महिन्यांत तिची गुणवंत जैन ऊर्फ निकेश मधानीशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. कामानिमित्त त्याने तिला त्याच्या अंधेरीतील वर्सोवा परिसरातील राहत्या घरी बोलाविले होते. त्यामुळे ती त्याच्या घरी गेली होती. यावेळी त्याने तिला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले होते. शीतपेय प्यायल्यानंतर ती बेशुद्ध झाली होती. याच संधीचा फायदा घेत त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. तिचे अश्‍लील व्हिडीओ काढले. शुद्धीवर आल्यानंतर तिला हा प्रकार समजला होता. त्यामुळे तिने त्याच्याशी वाद घालून त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली होती. यावेळी त्याने तिचे अश्‍लील व्हिडीओ सोशल मिडीयासह तिच्या पतीला पाठवून तिची बदनामी करण्याची धमकी दिली होती.

बदनामीच्या भीतीने तिने त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली नव्हती. त्यानंतर तो तिला तिचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करत होता. तिच्यावर वारंवार लैगिंक अत्याचार करत होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस अशी धमकी त्याने तिला दिली होती. त्याच्याकडून होणार्‍या ब्लॅकमेल, लैगिंक अत्याचारासह जिवे मारण्याच्या धमकीला कंटाळून तिने वर्सोवा पोलीस ठाण्यात गुणवंत जैन ऊर्फ निकेश मधानीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी त्याच्याविरुद्ध ३७६ (२), ३२८, ५०६ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच गुरुवारी रात्री उशिरा त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला शुक्रवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

गुणवंत जैन ऊर्फ निकेश मधानी हा भाईंदरच्या प्रतिज्ञा अपार्टमेंटच्या सी विंगच्या फ्लॅट क्रमांक १०२ मघ्ये राहतो. पिडीत महिला एका अवॉर्ड शोमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून गेली होती. यावेळी तिची सोशल मिडीयावरुन निलेश मधानीशी ओळख झाली होती. त्याने तिला तो ब्रॅण्ड शूट ऍवार्ड पोज शो करत असल्याचे सांगितले. या शोसाठी तिला भेटायचे आहे असे सांगून त्याने तिला अंधेरीतील वर्सोवामधील एका फ्लॅटमध्ये बोलाविले होते. तिथे गेल्यानंतर त्याने तिच्या शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. तिचे अश्‍लील व्हिडीओ काढून तिला ब्लॅकमेल करुन तिच्यावर वारंवार लैगिंक अत्याचार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page