खिडकीतून घरात प्रवेश करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार
लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या गुन्ह्यांत आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
31 मे 2025
मुंबई, – खिडकीतून घरात प्रवेश करुन एका सतरा वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार करुन तिने हा प्रकार कोणाला सांगितला तर तिची समाजात बदनामी देण्यात आल्याचा प्रकार विक्रोळी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच 31 वर्षांच्या आरोपीस पार्कसाईट पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर आरोपीस विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
पिडीत मुलगी ही सतरा वर्षांची असून ती तिच्या कुटुंबियांसोबत विक्रोळी परिसरात राहते. याच परिसरात राहणारा आरोपी पिडीत मुलीच्या परिचित असून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. 10 मेला रात्री तीन वाजता ही मुलगी घरात होती. यावेळी आरोपी खिडकीतून तिच्या घरात घुसला. जिवे मारण्याची धमकी देत त्याने तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. याबाबत कोणालाही काहीही सांगितले तर तिची समाजात बदनामी करण्याची धमकी दिली होती. बदनामीसह जिवाच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही.
अखेर 29 मेला तिने घडलेला प्रकार पार्कसाईट पोलिसांना सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपीस विक्रोळी येथून पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांचा पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत माळी हे तपास करत आहेत.