अपघातात जखमी झालेल्या ३५ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू

साडेचार महिन्यानंतर अज्ञातचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – अपघातात जखमी झालेल्या इम्रान कादिर खान या ३५ वर्षांच्या व्यक्तीचा जे. जे हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी साडेचार महिन्यानंतर अज्ञात कारचालकाविरुद्ध विक्रोळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर कारचालक जखमी व्यक्तीला कुठलीही वैद्यकीय मदत किंवा अपघाताची माहिती पोलिसांना न देता पळून गेला होता. त्यामुळे त्याचा सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांकडून शोध सुरु आहे.

हा अपघात १६ सप्टेंबर २०२४ रोजी विक्रोळीतील सर्व्हिस रोड, पूर्व दुतग्रती महामार्गावरील मुंबईकडे जाणार्‍या ऐरोली ब्रिजवर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. इरफान कादिर खान हा मुंब्रा येथे राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. मृत इम्रान हा त्याचा मोठा भाऊ असून तोदेखील त्याच्यासोबत नवी मुंबईतील घणसोली, मिलिनियम बिजनेस पार्कमधील कंपनीत कामाला होता. त्याची बहिण रुक्सार खान ही अंधेरीतील वर्सोवा परिसरात राहते. १६ सप्टेंबर २०२४ रोजी तो बहिणीला भेटण्यासाठी तिचे शाळेचे प्रमाणपत्रासह इतर दस्तावेज देण्यासाठी जाणार होता. ठरल्याप्रमाणे दुपारी एक वाजता तो घाटकोपरला जाण्यासाठी त्याच्या बाईकवरुन निघाला होता. ही बाईक पूर्व दुतग्रती महामार्ग, ऐरोली-मुलुंड फ्लायओव्हरवरुन जात सताा एका अज्ञात वाहनाने त्याच्या बाईकला धडक दिली होती. त्यात इम्रान हा गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु होते.

मात्र हॉस्पिटलमध्ये सोयी सुविधांचा अभाव असल्याने त्याल कुर्ला येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. तिथे औषधोपार केल्यानंतर त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र घरी आल्यानंतर त्याच्या पायाची जखम चिघळल्याने, त्याला प्रचंड वेदना होऊ लागल्याने मुंब्रा येथील मेटनिर्टी ऍण्ड ऑथोपेडिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे काही दिवस उपचार केल्यानंतर त्याला पुन्हा डिस्चार्ज देण्यात आला. मात्र घरी आल्यानंतर काही दिवसांनी त्याला पुन्हा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्याला जे. जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात ाअले होते.

तिथेच उपचार सुरु असताना २७ डिसेंबर २०२४ रोजी त्याचा मृत्यू झाला होात. सर्व विधी पार पडल्यानंतर इरफानची विक्रोळी पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात आली होती. त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने वाहन चालवून एका व्यक्तीच्या कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा विक्रोळी पोलिसाकडून तपास सुरु आहे. सप्टेंबर महिन्यांत अपघात झाल्यानंतर तब्बल साडेचार महिने इम्रानवर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. अखेर जे. जे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातप्रकरणी साडेचार महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page