पोलीस ठाण्यातच हायव्होलटेज ड्राम्याने एकच खळबळ

महिला पोलीस उपनिरीक्षकाचा राग अनावर झाला

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 सप्टेंबर 2025
मुंबई, – व्ही. पी रोड पोलीस ठाण्यात झालेल्या एका हायव्होलटेज ड्राम्याच्या व्हिडीओने सोशल मिडीयावर प्रचंड खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमध्ये तक्रार घेण्यावरुन झालेल्या वादानंतर तिथे उपस्थित महिला पोलीस उपनिरीक्षक दुर्गा मगन खर्डे या प्रचंड संतापल्या आणि त्यांचा राग अनावर झाला. त्यातून त्यांनी त्यांची नेमप्लेट तक्रार नोंदविण्यासाठी आलेल्या तरुणीच्या दिशेने फेंकली. हा व्हिडीओमुळे मुंबई पोलिसांची प्रतिम मलिन झाल्याने त्याची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली असून या संपूर्ण प्रकणाची चौकशी सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर वाघ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दुसरीकडे स्वतचा गुन्हा लपविण्यासाठी संबंधित तरुण-तरुणींनी विनाकारण पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याचे बोलले जाते. उपनिरीक्षक दुर्गा खर्डे या त्यांच्या कामात व्यस्त होत्या. तक्रार नोंदविताना या दोघांनी गोंधळ घालून त्यांच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, शांत राहण्यास सांगून ते तिथे गोंंधळ घालत होते, त्यातून हा प्रकार घडल्याचे बोलले जाते.

आर्थिक वादातून दोन गटात वाद सुरु होता. यावेळी तक्रारदार व त्याची सहकारी महिला कर्मचारी संबंधित कार्यालयात गेले होते. पैशांवरुन त्यांनी तिथे प्रचंड गोंधळ घातला आणि कंपनीच्या कर्मचार्‍यांना शिवीगाळ केली होती. काही वेळानंतर तक्रारदार तरुण आणि कंपनीचे कर्मचारी व्ही पी रोड पोलीस ठाण्यात आले. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केला होता. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करुन त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता. पोलीस ठाण्याच्या बाहेर आल्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यानंतर त्यांनी एकमेकांविरुद्ध तक्रार करण्याचा ठरविले होते. याच दरम्यान तिथे तक्रारदार तरुण त्याच्या सहकारी तरुणीसोबत आला. यावेळी उपनिरीक्षक दुर्गा खर्डे या ऑनलाईन फसवणुकीची एक तक्रार नोद करत होत्या. मात्र त्यांच्या गोंधळामुळे त्यांना त्यांच्यात अडथळा येत होता. वारंवार समजावून ते दोघेही शांत होत नव्हते. त्यांची तक्रार नोंदविण्याचा त्यांचा हट्ट होता. त्यातून हा वाद वाढला.

यावेळी उपनिरीक्षक दुर्गा खरडे यांचा राग अनावर झाला आणि ते प्रचंड संतापल्या. त्यात त्यांनी त्यांच्याशी हुज्जत घालून त्यांची नेमप्लेट तरुणीच्या दिशेने फेंकून मारली. मात्र सुर्दैवाने तिला काही दुखापत झाली नाही. हा प्रकार तिचा मित्र त्याच्या मोबाईलमध्ये शूट करत होता. पोलीस ठाण्यात झालेल्या या ड्राम्याचे व्हिडीओ त्याने नंतर सोशल मिडीयावर व्हायरल करुन पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पोलीस तक्रारदारांशी कसे वागतात, त्यांच्याशी उद्धट वर्तन करतात असे दाखविण्याचा प्रयत्न केला होता. तक्रार नोंदविण्यास गेल्यानंतर आमची तक्रार न नोंदविता पोलीस समोरील व्यक्तींना आदराने वागणुक देत होते असा आरोप केला होता. गुरुवार 18 सप्टेंबरचा घडलेल्या घटनेचा हा व्हिडीओ सोमवारी सर्वत्र व्हायरल झाल्याने त्याची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर वाघ यांना देण्यात आले. त्या दिवशी नक्की काय घडले, कोणी कोणाविरुद्ध तक्रार नोंंदविण्यासाठी आले होते. पोलिसांनी प्रकरण मिटविले तर पुन्हा या तरुणासह तरुणीने पोलीस ठाण्यात का धिंगाणा घातला. महिला उपनिरीक्षक दुर्गा खर्डे यांचा राग का अनावर झाला, व्हिडीओमागील पूर्ण सत्य काय आहे. हेतूपुरस्सर पोलिसांची बाजू मलिन होईल असाच व्हिडीओ व्हायरल झाला का, त्यामागे नक्की काय कारण आहे याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. पोलीस ठाण्यातील सीसीटिव्ही फुटेजमध्ये हा प्रकार कैद झाला आहे, त्यामुळे या फुटेजची पोलिसाकडून पाहणी होणार असल्याचे एका अधिकार्‍याने बोलताना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page