मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
15 जुलै 2025
मुंबई, – दहा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांवर त्यांच्याच परिचित व्यक्तीने अनैसगिंक लैगिंक अत्याचार केल्याची घटना वडाळा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अनैसगिंक लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच 30 वर्षांच्या आरोपीस वडाळा पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पिडीत दोन्ही मुलांची लवकरच मेडीकल होणार आहे.
30 वर्षांची तक्रारदार महिला ही वडाळ्यातील अॅण्टॉप हिल परिसरात राहत असून तिचा स्वतचा कपड्याचा व्यवसाय आहे. तिला दहा वर्षांचा एक मुलगा असूनतिच्या नणंदेचाही एक दहा वर्षांचा मुलगा आहे. रविवारी 17 जुलैला सकाळी साडेनऊ वाजता या दोन्ही मुलांना आरोपीने फुस लावून त्यांच्या राहत्या घरापासून टॅक्सीने दादर रेल्वे स्थानकात आले. त्यानंतर ते तिघेही लोकलने कल्याणच्या दिशेने जात होते. प्रवासादरम्यान त्याने दोन्ही मुलांशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला होता.
हा प्रकार एक दक्ष प्रवाशाला संशयास्पद वाटला होता. त्यामुळे त्याने ही माहिती कल्याण रेल्वे स्थानकातील एका रेल्वे पोलिसांना सांगितली होती. या प्रकारानंतर आरोपीला दोन्ही मुलांसोबत पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या दोन्ही मुलांची पोलिसांनी चौकशी केली असता पंधरा दिवसांपूर्वी आरोपीने त्यांना वडाळ्यातील आयमॅक्स सिनेमामागील एका झाडीत नेऊन त्यांच्याशी अनैसगिंक लैगिंक अत्याचार केल्याची कबुली दिली. त्यामुळे आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्याचा तपास वडाळा पोलिसांकडे वर्ग केला होता.
गुन्हा दाखल होताच आरोपीस पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. एक दक्ष प्रवाशाच्या सतर्कमुळे हा प्रकार उघडकीस आल्याने पोलिसांकडून सांगण्यात आले.