मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – सोळा वर्षांच्या मूक-बधीर अल्पवयीन मुलीवर तिच्याच मावस भावाने लैगिंक अत्याचार केल्याची घटना वडाळा परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी २२ वर्षांच्या भावाविरुद्ध वडाळा टी टी पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
१६ वर्षांची पिडीत मुलगी तिच्या कुटुंबियांसोबत वडाळा परिसरात राहत असून ती मूक-बधीर आहे. आरोपी मूळचा झारखंडचा रहिवाशी असून तो तिथेच त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. तो तिच्या मावशीचा मुलगा असून नात्याने तिचा मावस भाऊ आहे. मे ते ऑक्टोंबर २०२४ या कालावधीत तो त्यांच्या घरी वास्तव्यास होता. पिडीत मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले होते. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर अनेकदा जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला केला होता. दोन दिवसांपूर्वी हा प्रकार मुलीकडून तिच्या आईला समजताच तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर तिने वडाळा टी टी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी मावस भावाविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तो त्याच्या झारखंडच्या गावी निघून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना सोमवारी उघडकीस येताच स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.