डंपरच्या चाकाखाली आल्याने तरुणाचा मृत्यू

अपघातप्रकरणी डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – डंपरच्या चाकाखाली आल्याने रोहन प्रमोद गुप्ता या २१ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. अपघातात संकेत विरेंद्रकमार शर्मा हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपी डंपरचालक दर्शन सुभाष कासडेकर याच्याविरुद्ध ना. म जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हा अपघात गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता वरळीतील पांडुरंग बुधकर मार्ग, बिर्ला सेंच्युरियन मिल गेटसमोर झाला. संकेत शर्मा हा २१ वर्षांचा तरुण वरळीतील मद्रासवाडी, मोतीलाल नेहरुनगर परिसरात राहतो. रोहन गुप्ता हा त्याचा बालपणीचा मित्र असून तो त्याच्या शेजारी राहत होता. गुरुवारी रात्री नऊ वाजता संकेत हा रोहनसोबत त्याच्या बाईकवरुन त्याच्या वडिलांना भेटण्यासाठी एल्फिस्टन येथील पांडुरंग बुधकर मार्ग येथे गेले होते. रात्री साडेनऊ वाजता त्यांची बाईक बिर्ला सेच्युरीयन मिल गेट क्रमांक एक व सात दरम्यान आली होती. यावेळी तैथून जाणार्‍या एका डंपरने त्यांच्या बाईकला जोरात धडक दिली होती. अपघातात त्यांची बाईक स्लीप झाली आणि ते दोघेही खाली पडले. यावेळी डंपरचे मागचे चाक रोहनच्या छातीसह पोटावरुन गेल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला होता.

जखमी झालेल्या रोहनला तिथे उपस्थित लोकांनी टॅक्सीने तातडीने केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. जखमी झालेल्या दर्शनला प्राथमिक औषधोपचारानंतर सोडून देण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच ना. म जोशी मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी संकेत शर्मा याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी डंपरचालक दर्शन कासडेकर याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने डंपर चालवून एका तरुणाच्या मृत्यूस तर दुसर्‍याला जखमी होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page