मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – वरळी हिट ऍण्ड रन गुन्ह्यांत तीन महिन्यांपूर्वीच वरळी पोलिसांनी शिवडीतील लोकल कोर्टानेत ७१३ पानाचे आरोपपत्र सादर केले असून त्यात ३८ साक्षीदारांची जबानी नोंदविण्यात आली आहे. आरोपपत्र सादर करण्यात आलेल्यांमध्ये मुख्य आरोपी मिहीर राजेश शहा, त्याचे वडिल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे पालघर जिल्ह्याचे उपनेते राजेश दामजी शहा आणि त्यांचा कारचालक राजऋषी राजेंद्रसिंह बिदावत यांचा समावेश आहे. या गुन्ह्यांत वरळी पोलिसांना एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार टॅक्सीचालक सापडला असून त्याने अपघात प्रत्यक्षात पाहिल्याचा दावा केला आहे. त्यामुळे त्याची लवकरच पोलिसांकडून जबानी नोंदवून पुरवणी आरोपपत्र सादर केले आहे. या आरोपपत्रात मिहीर हाच अपघाताचा मुख्य आरोपी असून त्याने अपघाताच्या वेळेस मद्यप्राशन केल्याचा दावा पोलिसांनी करताना त्याच्याविरुद्ध भक्कम पुरावे असल्याचे म्हटले आहे.
जुलै महिन्यांत वरळी येथे मद्यप्राशन बीएमडब्ल्यू कार चालविताना मिहीरने एका बाईकस्वाराला धडक दिली होती. बाईकवरील महिलेला बोनेटवरुन दिड किलो फरफरत नेऊन नंतर तिच्या अंगावर कार नेली होती. त्यात कावेरी प्रदीप नाखवा या महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच मिहीरचे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे पालघर जिल्ह्याचे उपनेते राजेश दामजी शहा यांच्यासह त्यांचा कारचालक राजऋषी राजेंद्रसिंह बिदावत या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर राजेश शहा यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. या दोघांच्या अटकेनंतर मिहीर हा पळून गेला होता. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी करुन विशेष मोहीम सुरु केली होती. ही शोधमोहीम सुरु असताना विरारच्या विरार फाटा परिसरातून मिहीर शहा याला पोलिसांनी अटक केली. तो एका हॉटेलमध्ये त्याच्या मित्रासोबत लपला होता, गुन्हा घडल्यानंतर ७२ तासानंतर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. तेव्हापासून मिहीर आणि राजऋषी हे दोघेही न्यायालयीन कोठडीत आहे. या गुन्ह्यांचा तपासाला तीन महिने पूर्ण होण्याआधीच वरळी पोलिसांनी गुरुवारी तिन्ही आरोपीविरुद्ध आरोपपत्र सादर केले आहे. ७१३ पानांच्या या आरोपपत्रात ३८ जणांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. त्यात मृत कावेरी यांचा पती प्रदीप नाखवासह बारमधील कर्मचारी, पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांचा समावेश आहे. परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे अपघाताच्या वेळेस मिहीर शहाने मद्यप्राशन केल्याचे उघडकीस आले आहे.
मिहीरचा मेडीकल रिपोर्ट नेगीटिव्ह आला असला तरी मिहीर हा दारुच्या नशेत होता, त्याने स्कूटरला धडक दिली आणि त्यात कावेरी यांचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध भादवीसह मोटार कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मिहीर आणि राजऋषी यांचे ड्रायव्हिंग लायसन्स तसेच कारची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. या गुन्ह्यांत पोलिसांना एक महत्त्वाचा साक्षीदार सापडला आहे. टॅक्सीचालक असलेल्या या साक्षीदाराने प्रत्यक्षात अपघात झाल्याचे पाहिले आहे. संपूर्ण घटना त्याच्यासमोरच झाला होता. अपघातानंतर मिहीर पळून गेला हेदेखील त्याने पाहताना मिहीरला ओळखले आहे. त्यामुळे त्याची साक्ष लवकरच लोकल कोर्टात नोंदविली जाणार आहे. मिहीर हा अपघातापूर्वी जुहूच्या एका हॉटेलमध्ये गेला होता. तिथे त्याने मद्याप्राशन केले होते. त्यानंतर त्याने एका वाईन शॉपमधून बिअर घेतले होते. ते बिअर तो कारमध्ये ड्रायव्हिंग करताना प्यायला होता. या हॉटेलसह वाईन शॉपची बिलसह कर्मचार्यासह इतरांची जबानी नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे मिहीरविरुद्ध आरोप सिद्ध करण्याइतपत पोलिसाकडे भक्कम पुरावे आहे असा दावाच पोलिसांकडून करण्यात आला आहे.