अकरा व तेरा वर्षांच्या मुलीवर पित्याकडून लैगिंक अत्याचार

गुन्हा दाखल होताच 36 वर्षांच्या पित्याला अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
20 मे 2025
मुंबई, – अकरा व तेरा वर्षांच्या मुलीवर त्यांच्याच सावत्र पित्याने लैगिंक अत्याचार करुन मानसिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार वरळी परिसरात उघडकीस आली आहे. पिडीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन वरळी पोलिसांनी 36 वर्षांच्या आरोपी पित्याविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपी पित्याला अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

47 वर्षांची तक्रारदार महिला ही वरळी परिसरात राहत असून तिला अकरा आणि तेरा वर्षांच्या दोन मुली आहेत. आरोपी हा तिचा पती असून मुलींचा सावत्र पिता आहे. ही महिला घरकाम करत असल्याने अनेकदा ती कामानिमित्त बाहेर जात होती. याच संधीचा फायदा घेऊन आरोपी या दोन्ही मुलीशी जवळीक निर्माण करुन त्यांच्यावर लैगिंक अत्याचार करत होता. त्यांच्या छातीसह प्रायव्हेट पार्टला नकोसा स्पर्श करुन त्यांचा मानसिक शोषण करत होता. काही दिवसांपूर्वीच त्याने तेरा वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नये म्हणून तो या दोघींना जिवे मारण्याची धमकी देत होता.

1 नोव्हेंबर 2024 ते 16 मे 2025 या कालावधीत त्याने अनेकदा या दोन्ही मुलींवर लैगिंक अत्याचार करुन त्यांचा मानसिक शोषण करत होता. अलीकडेच हा प्रकार मुलीकडून त्यांच्या आईला समजला होता. ही माहिती ऐकून तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिने आरोपी पतीविरुद्ध वरळी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच त्याला शनिवारी पोलिसांनी अटक केली.

अटकेनंतर त्याला रविवारी पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडीत सुनावली आहे. पिडीत दोन्ही मुलींना नंतर नायर हॉस्पिटलमध्ये मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते. माणुसकीला काळीमा फासणार्‍या या घटनेने वरळीतील स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page