बाबा सिद्धीकी यांच्या हत्येचा राजकारण करु नका

मला व कुटुंबियाला न्याय हवा आहे- झिशान सिद्धीकी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – वडिलांच्या हत्येनंतर संपूर्ण सिद्धीकी कुटुंबिय कोरमडून पडले असून माझ्या वडिलांच्या हत्येचा कोणीही राजकरण करु नये. मला आणि माझ्या कुटुंबियांना न्याय हवा आहे. कारण माझ्या वडिलांनी कधीच कोणाचे वाईट केले नाही. गरीब निष्पाप लोकांचे जीवन आणि घरांचे संरक्षण केल्याचा दावा त्यांच्या आमदार पूत्र झिशान सिद्धीकी यांनी केला आहे. बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर पहिल्यांदाच झिशान सिद्धीकी यांनी ट्विटद्वारे एक संदेश देताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान बुधवारनंतर दुसर्‍या झिशान सिद्धीकी यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडील माहिती पोलिसांशी शेअर केली होती. त्यांची लवकरच गुन्हे शाखेकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे.

शनिवारी १२ ऑक्टोंबरला वांद्रे येथील कार्यालयातून घरी जाताना बाबा सिद्धीकी यांच्यावर तीन हल्लेखोरांनी गोळीबार केलाद होता. या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला होता. याच हत्येचा तपास खंडणीविरोधी पथकाकडे असून गुन्हा दाखल होताच आतापर्यंत चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यात गुरमेल बलजीत सिंग आणि धर्मराज राधे कश्यप या दोन शूटरसह लॉजिस्टिक मदतीसह आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी प्रविण रामेश्‍वर लोणकर आणि हरिशकुमार बालकराम निशाद या चौघांना पोलिसंनी अटक केली आहे. चारही आरोपी सध्या २१ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले आहे. या हत्येमागे बिष्णोई टोळी असल्याचे उघडकीस आले तरी हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. वांद्रे परिसरातील एसआरए वादासह सिनेअभिनेता सलमान खान याच्याशी असलेले जवळीक या कारणावरुन बाबा सिद्धीकी यांची बिष्णोई टोळीकडून हत्या झाल्याचे बोलले जाते. मात्र मुंबई पोलिसाकडून याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही. या हत्येनंतर बाबा सिद्धीकी यांचे आमदार पूत्र झिशान सिद्धीकी पहिल्यांदाच पोलीस मुख्यालयात आले होते. त्यांनी पोलीस आयुक्त विवेक फसणळकर, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम यांची भेट घेतली. यावेळी झिशानने पोलिसांना त्याच्याकडील सर्व माहिती पोलिसांना सांगितली. जवळपास अर्ध्या तास ही भेट झाली होती.

गुरुवारी दुपारी तीन वाजता झिशान सिद्धीकी यांनी पुन्हा पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ट्विटद्वारे त्यांची पाहिली पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल केली आहे. त्यात त्यांनी त्यांचे वडिल बाबा सिद्धीकी यांनी गरीब निष्पाव लोकांचे जीवन आणि घरांचे संरक्षण केले आहे. लोकांची सेवा करताना त्यांनी त्यांचा जीव गमवाला आहे. त्यामुळे आमचे संपूर्ण कुटुंब सध्या कोलमडून पडले आहे. या हत्येची कोणीही राजकरण करुन नये. त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये. मला आणि माझ्या कुटुंबियांना न्याय हवा आहे असे त्यांनी ट्विटद्वारे आपल्या भावना व्यक्त केला आहे. याच प्रकरणात लवकरच झिशान सिद्धीकी यांची पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे. या जबानीत ते पोलिसांना काय माहिती देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बाबा सिद्धीकी हत्याप्रकरणी तिघांविरुद्ध एनओसी जारी
बाबा सिद्धीकी यांच्या हत्येप्रकरणी तिघांना वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी केले आहे. त्यात शूटर शिवकुमार गौतम, मोहम्मद जिशान अख्तर आणि शुभम रामेश्‍वर लोणकर यांचा समावेश आहे. ते तिघेही विदेशात पळून जाण्याची शक्यता असल्याने त्यांच्या अटकेसाठी आता एलओसी जारी करण्यात आल्याचे बोलले जाते. बाबा सिद्धीकी यांच्यावर गोळीबार करणार्‍या तीनपैकी धर्मराज कश्यप आणि गुरमेल सिंग यांना काही तासांत पोलिसांनी अटक केली होती. या दोघांच्या अटकेनंतर तिसरा शूटर शिवकुमार गौतम हा पळून जाण्यात यशस्वी झाला होता. अटक आरोपींच्या चौकशीतून शिवकुमारसह मोहम्मद जिशान अख्तर आणि शुभम लोणकर यांचा सहभाग उघडकीस आला आहे. आतापर्यंतच्या चौकशीत ते तिघेही महाराष्ट्राबाहेर पळून गेले आहे. त्यांच्या अटकेसाठी गुन्हे शाखेचे काही टिम इतर राज्यात पाठविण्यात आले आहे. मात्र या तिघांनाही अद्याप अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. ते विदेशात पळून जाण्याची शक्यता असल्याने त्यांच्याविरुद्ध आता लुक आऊट नोटीस बजाविण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page