मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३१ डिसेंबर २०२४
मुंबई, – चोरीसह गहाळ झालेले सुमारे २९ लाखांचे २१३ मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहे. नवीन वर्षांच्या पूर्वसंध्येला चोरीसह गहाळ झालेले मोबाईल परत करुन मुंबई पोलिसांनी संबंधित मोबाईलधाकांना गिफ्ट दिल्याची चर्चा आहे. या सर्वांनी मुंबई पोलिसांचे आभार व्यक्त करुन त्यांनी दिलेल्या गिफ्टचा स्विकार केला होता.
परिमंडळ चारच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांत चोरीसह गहाळ झालेल्या मोबाईलच्या तक्रारीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली होती. या वाढत्या मोबाईल तक्रारीची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आले होते. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, मध्य प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुकत् अनिल पारस्कर, पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांच्या मार्गदर्शनाखाली भोईवाडा, काळाचौकी, माटुंगा, रफि अहमद किडवाई मार्ग, सायन, ऍण्टॉप हिल, वडाळा टी टी पोलीस ठाण्यातील नऊ अधिकारी आणि तेवीस पोलीस कर्मचार्यांनी चोरीसह गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध सुरु केला होता.
या पथकाने चोरीसह गहाळ झालेल्या मोबाईलचा तांत्रिक पद्धतीने शोध घेतला. त्यानंतर या पथकाने मुंबईसह महाराष्ट्र आणि इतर राज्यात जाऊन २१३ हून अधिक महागडे मोबाईल जप्त केले होते. या मोबाईलची किंमत सुमारे २९ लाख रुपये इतकी आहे. या मोबाईलच्या मालकांचा शोध घेण्यात आला होता. मंगळवारी एका कार्यक्रमांत ते मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले होते. सायन येथील मानव सेवा संघात एका कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तिथेच ते मोबाईल परत करुन मुंबई पोलिसांना संबंधित मालकांना नवीन वर्षांच्या पूर्वसंध्येला एक सुंदर गिफ्ट दिले होते.
चोरीसह गहाळ झालेले मोबाईल परत मिळतील अशी कोणालाही शाश्वती नव्हती. मात्र या पोलीस पथकाने महाराष्ट्रासह इतर राज्यात तपास सुरु ते सर्व मोबाईल शोधून त्यांच्या मालकांना परत केले होते. त्यामुळे या सर्वांनी मुंबई पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले होते.