स्वतच्याच तेरा वर्षांच्या मुलीवर मातेकडून लैगिंक चाळे
कापड व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन अत्याचाराचा पर्दाफाश
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
18 मे 2025
मुंबई, – स्वतच्याच तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी तिच्याच मातेने लैगिंक चाळे करुन तिचा मानसिक शोषण केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना मालाड परिसरात उघडकीस आली आहे. शेजारी राहणार्या एका कापड व्यावसायिकाला बळीत मुलीने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यांच्याच तक्रारीवरुन दिडोंशी पोलिसांनी आरोपी मातेविरुद्ध अनैसगिंक विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तिची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीनंतरच तिच्यावर अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
32 वर्षांचे तक्रारदार कापड व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत मालाड परिसरात राहतात. त्यांच्याच शेजारी तेरा वर्षांची बळीत मुलगी तिच्या पालकांसोबत राहते. आरोपी महिला बळीत मुलीची आई आहे. गेल्या काही दिवसांपासून तिची आई तिच्याशी अश्लील चाळे करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार करत होती. तिच्या प्रायव्हेट पार्टसवर अश्लील चाळे करुन तिच्याकडून तिचा सतत मानसिक शोषण सुरु होता. 1 एप्रिल ते 14 मे 2025 या कालावधीत तिने अनेकदा तिच्या मुलीवर लैगिंक चाळे केले होते.
स्वतच्याच आईकडून सुरु असलेल्या या किळसवाणी लैगिंक अत्याचाराला बळीत मुलगी प्रचंड कंटाळून गेली होती. त्यातून तिला मानसिक नैराश्य आले होते. बदनामीच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र नंतर या गोष्टी असह्य झाल्याने तिने घडलेला प्रकार तिच्या शेजारीच राहणार्या तक्रारदार कापड व्यापार्याला सांगून स्वतच्या आईपासून तिला वाचविण्याची विनंती केली होती. बळीत मुलीकडून ही माहिती ऐकल्यांनतर त्यांना धक्काच बसला होता.
त्यानंतर त्यांनी तिला दिडोंशी पोलीस ठाण्यात आणून तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला सांगून आरोपी महिलेविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपी महिलेविरुद्ध अनैसगिंक विनयभंगासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत तिला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून तिची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीनंतर तिच्यावर अटकेची कारवाई केली जाणार आहे. शनिवारी उघडकीस आलेल्या या प्रकाराने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.